Rahul Gandhi: हा हायड्रोजन बॉम्ब नाही तर..., मतचोरीवरून राहुल गांधींचा EC अन् भाजपवर हल्लाबोल

Rahul Gandhi On Election Commission Of India: राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत मतचोरीचा मोठा बॉम्ब फोडला. मतचोरीच्या मुद्द्यावरून त्यांनी मोदी सरकार आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावर अनेक गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी पुरावे देखील सादर केले.
NDA सरकार कोसळणार? राहुल गांधींच्या दाव्याने खळबळ
Rahul Gandhi On NDA GovernmentSaam Tv
Published On

Summary -

  • राहुल गांधींनी भाजप व निवडणूक आयोगावर मतचोरीचे गंभीर आरोप केले.

  • कर्नाटकातील ६०१८ मते वगळल्याचे पुरावे सादर केले.

  • दलित, ओबीसी आणि आदिवासी मतं टार्गेट केली जात असल्याचा दावा केला.

  • मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर थेट आरोप केला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजप आणि निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप केला आहे. या मुद्द्यावर भाजपला घेरत राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत पुरावे सादर करत भाजपवर टीका केली. राहुल गांधी यांनी सांगितले की, 'मतचोरीच्या मुद्द्यावरून मी जे काही बोलत आहे ते मी मोठ्या जबाबदारीने बोलत आहे. माझ्याकडे याचे पुरावे आहेत. मतदार यादीतून अनेक लोकांची नावं वगळण्यात आली आहेत.

राहुल गांधी यांनी मतचोरीप्रकरणी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर निशाणा साधला. कर्नाटकमधील उदाहरण देत त्यांनी गंभीर आरोप केले. 'मतचोरी होत असल्याचे माझ्याकडे १०१ टक्के पुरावे आहेत. दलीत, आदिवासी आणि ओबीसी यांची नावे वगळली जात आहेत. कर्नाटकमधील आनंद मतदारसंघात ६०१८ मते वगळली. काँग्रेसच्या मतदारांना वगळले जात आहे.', असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

NDA सरकार कोसळणार? राहुल गांधींच्या दाव्याने खळबळ
Rahul Gandhi: धावत आला अन् राहुल गांधींचा किस घेऊन पळाला; बाईक रॅलीत तरुणाचा भलताच प्रकार

राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी उदाहरणं देत आयोगावर हल्लाबोल केला आहे. आयुक्तांच्या विरोधात माझ्याकडे १०० टक्के पुरावे आहेत. मी देशावर अन् संविधानावर प्रेम करतो. पण सध्या देशात मतांना हायजॅक केले जातेय. टार्गेट करून काँग्रेसच्या मतांना कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय.', असे राहुल गांधी म्हणाले.

NDA सरकार कोसळणार? राहुल गांधींच्या दाव्याने खळबळ
Rahul Gandhi : राहुल गांधींना पोलिसांनी अडवले, एसपीसोबत बाचाबाची, म्हणाले- 'तुम्ही मला तिथे...'

राहुल गांधी यांनी असाही आरोप केला की, 'कर्नाटकमध्ये बाहेरून मत चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. १४ मिनिटांत १२ मते काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. एका व्यक्तीच्या नंबरवर दोन फॉर्म भरण्यात आले. ३६ सेकंदात फॉर्म भरला अन् जमा केला गेला. कर्नाटकमध्ये जे झाले ते महाराष्ट्र, हरियाणा अन् उत्तर प्रदेशसह अनेक राज्यात झाले आहे. ज्या ठिकाणी काँग्रेसने जागा जिंकल्या त्या ठिकाणाची मते हटवण्यात आली. आयोगाकडून सीआयडीला कोणताही माहिती दिलेली नाही.'

NDA सरकार कोसळणार? राहुल गांधींच्या दाव्याने खळबळ
Rahul Gandhi : राहुल गांधींना पोलिसांनी अडवले, एसपीसोबत बाचाबाची, म्हणाले- 'तुम्ही मला तिथे...'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com