Rahul Gandhi: धावत आला अन् राहुल गांधींचा किस घेऊन पळाला; बाईक रॅलीत तरुणाचा भलताच प्रकार

Young Supporter Kisses Rahul Gandhi During Bike Rally: बिहारमधील अररिया येथे एका तरुणाने बाईक रॅली दरम्यान राहुल गांधींना मिठी मारत त्यांना किस केलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
Young Supporter Kisses Rahul Gandhi During Bike Rally
youth hugged and kissed Rahul Gandhi during his voter rights yatra in Bihar’s Araria.
Published On
Summary
  • बिहारच्या अररिया येथे राहुल गांधींच्या बाईक रॅलीदरम्यान सुरक्षा भंग.

  • तरुणाने राहुल गांधींना मिठी मारून किस घेतल्याने गोंधळ.

  • सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तरुणाला तात्काळ बाजूला खेचून कारवाई केली.

  • घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

बिहारमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मतदार हक्क यात्रा काढलीय. या यात्रेदरम्यान एका तरुणाने भलताच प्रकार केलाय. अररियामध्ये राहुल गांधी बाईकवरुन जात असताना एक युवकाने सुरक्षा घेरा तोडत राहुल गांधींकडे गेला. त्यानंतर त्यांना राहुल गांधींना मिठी मारली नंतर चुंबन त्यांचे घेतले. (Voter Rights Yatra Young Supporter Kisses Rahul Gandhi In Bike Rally)

त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्या तरुणाला बाजूला खेचले आणि चापटही मारली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. काँग्रेस नेते राहुल गांधी बिहारमध्ये मतदार हक्क यात्रेद्वारे राज्याचा दौरा करत आहेत. त्यांच्यासोबत इंडिया आघाडीच्या नेत्यांसह राजदचे तेजस्वी यादव देखील उपस्थित आहेत.

आज राहुल गांधींची यात्रा अररियाच्या दिशेने निघाली आहे. यावेळी एक तरुणाने सुरक्षा घेरा तोडत थेट राहुल गांधींच्या जवळ पोहोचला. त्याने बाईकवर बसलेल्या राहुल गांधींना मिठी मारली आणि त्यांचे चुंबन घेतले. यादरम्यान, सुरक्षा कर्मचाऱ्याने त्या तरुणाला चापट मारुन पळवून लावलं. या घटनेनंतर सर्व सुरक्षा कर्मचारी सक्रिय झाले. त्यानंतर त्यांनी राहुल गांधींकडे पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व लोकांना हुसकावून लावलं. सध्या हा चुंबनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com