
मुंबई पोलिसांनी कर्नाटकमधील ड्रग फॅक्टरीवर कारवाई करत ₹४०० कोटींचा एमडी ड्रग्स जप्त केला.
साकीनाका पोलिसांनी या प्रकरणी ४ आरोपींना अटक केली.
ही फॅक्टरी एमडी ड्रग्स तयार करण्यासाठी वापरली जात होती.
या कारवाईमुळे महाराष्ट्र व कर्नाटकातील ड्रग नेटवर्कचा मोठा खुलासा झाला आहे.
संजय गडदे, साम प्रतिनिधी
मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी ड्रग्सचा फॅक्टरी उद्धवस्त केलीय. मुंबई पोलिसांनी कर्नाटक राज्यात जाऊन MD ड्रॅग बनवणाऱ्या फॅक्टरीवर कारवाई केलीय.पोलिसांनी ४०० कोटींचा ड्रग्स जप्त केलाय. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी ४ आरोपींना अटक केलीय. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून १८८ किलो MD ड्रग जप्त करण्यात आले आहे.
कर्नाटकमधून हे सर्व आरोपी मुंबई शहरात MD ड्रग पुरवठा करत होते. आत्तापर्यंत एकूण ८ लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. या ड्रग्सप्रकरणी साकीनाक पोलीस ठाण्यात एप्रिलमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्या तपासदरम्यान पोलिसांना म्हैसूरमधील ड्रग्स फॅक्टरीचा तपास लागला. त्यानंतर साकीनाका पोलिसांनी कर्नाटक राज्यात धाड टाकली. या कारवाईत ३९० कोटीचे आमली पदार्थ ताब्यात घेण्यात आले आहेत.
याप्रकरणी परिमंडळ 10 चे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी कारवाईची माहिती दिली. एप्रिल महिन्याच्या शेवटी साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये ड्रग्स प्रकरणी एक तक्रार दाखल करण्यात आली होती. या आधारे तपास करत पहिल्या आरोपीकडून ५२ ग्रॅम ड्रग्स जप्त करण्यात आलं होतं. याच प्रकरणात अजून तीन आरोपींना अटक करण्यात आली.
सुरुवातीची दोन आरोपींकडून ४ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आली. त्यानंतर पकडण्यात आलेल्या आरोपीच्या चौकशीतून पोलिसांना म्हैसूरच्या फॅक्टरीचा तपास लागला. या आरोपींकडे एमडी ड्रग्सचा पुरवठा हा म्हैसूरच्या बाहेर उभारण्यात आलेल्या फॅक्टरीतून होत होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.