Tej Pratap Yadav arrives at Rabri Devi’s residence in Patna after reports of her deteriorating health. saam tv
देश विदेश

माजी मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली, धाकटा मुलगा दौरे रद्द करून भेटायला पोहोचला

Rabri Devi Health Condition Latest Update: बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांची प्रकृती अचानक बिघडली असून त्यांना भेटण्यासाठी तेज प्रताप यादव पाटण्यात दाखल झाले.

Omkar Sonawane

बिहाच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांचा मोठा मुलगा आणि जनशक्ती जनता दलचे राष्ट्रीय अध्यक्ष तेज प्रताप यादव त्यांना भेटण्यासाठी दाखल झाले. तेज प्रताप म्हणाले, माझी आई तब्येत बिघडल्याचे कळताच मी त्यांना भेटायला आलो आहेत. दुसरीकडे, लालू परिवाराने सकाळी सरकारकडून देण्यात आलेली सुरक्षा परत केली. राबडी यांच्या निवासस्थानी तैनात असलेला रक्षक परत पाठवण्यात आला.

सम्राट सरकारने राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या पत्नी राबडी यांची 'झेड प्लस' सुरक्षा काढून बिहार पोलिसांची विशेष सुरक्षा दिली होती. तेज प्रताप यांची सुरक्षाही कमी करण्यात आली असून त्यांना केवळ एक अंगरक्षक देण्यात आला आहे.

तेज प्रताप यादव शनिवारी पाटण्यातील १० सर्क्युलर रोड येथील राबडी देवींच्या निवासस्थानी पोहोचले. ते बराचवेळ आतमध्ये होते. बाहेर आल्यावर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. लालू परिवाराने सरकारी सुरक्षा काढून घेतल्याचे त्यांनी नाकारले. राबडी देवींची प्रकृती ठीक नसल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र आरजेडीने अद्याप राबडी देवींच्या प्रकृतीबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. त्या सध्या त्यांच्या निवासस्थानी विश्रांती घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

राबडींच्या निवासस्थानातून बाहेर आलेल्या तेज प्रताप यांनी पत्रकारांना सांगितले, सुरक्षा कोणीही परत दिलेली नाही. सुरक्षा रक्षक दबावाखाली होते. त्यांचे संपर्क तुटले असल्याचे ते वारंवार दाखवत होते. माताजींनी (राबडी देवी) कोणतीही सुरक्षा काढलेली नाही. त्यांची प्रकृती बरी नाही, मी त्यांना भेटायला आलो होतो. असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India squad announced : टी २० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, कुणाला पुन्हा संधी, कुणाचं कमबॅक?

Maharashtra News Live Update: नवी मुंबईत FDA आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Wednesday Horoscope: 7 राशींचं नशीब चमकणार! धनलाभासह मिळणार मोठी खुशखबर

Sleeping Without Underwear: रात्रीच्या वेळेस अंतर्वस्त्र घालून झोपणं योग्य की अयोग्य?

Rajmachi Fort : एकाच पठारावर दोन बालेकिल्ले! राजमाची किल्ल्याचे 'हे' रहस्य तुम्हाला माहितेय का?

SCROLL FOR NEXT