Bank Loan : कर्जदाराचा मृत्यू झाला तर बँक कोणाकडून वसूल करणार पैसे? वाचा महत्त्वाचा नियम

Banking Rules : कर्जदाराचा मृत्यू झाल्यावर बँकेचे कर्ज कोण फेडणार? पत्नी, मुलं की आई-वडिलांवर जबाबदारी येते? जाणून घ्या बँकेचे नियम.
Bank loan after death
Bank loan after deathsaam tv
Published On: 

घरातल्या कमावत्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्यास कुटुंबावर मोठं आर्थिक संकट कोसळते. अशा वेळी घरखर्च, मुलांचं शिक्षण आणि इतर जबाबदाऱ्यांसोबत मृत व्यक्तीच्या नावावर असलेल्या बँकेच्या कर्जाचा प्रश्नही निर्माण होतो. अशा परिस्थितीत बँक हे कर्ज कोणाकडून वसूल करते? पत्नी, मुलांना किंवा आई-वडिलांना स्वतःच्या पैशातून कर्ज फेडावे लागतं का? याबाबतचे महत्त्वाचे नियम जाणून घेऊया.

नातेवाईक असल्यामुळे कर्ज फेडावे लागते का?

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला म्हणून त्याचे बँकेचे कर्ज आपोआप माफ होत नाही. मात्र, मृत व्यक्तीची पत्नी, मुलं किंवा आई-वडील आहेत म्हणून त्यांना स्वतःच्या खिशातून कर्ज फेडण्याची जबाबदारी येत नाही.

Bank loan after death
Zodiac Signs : २०२६ संपण्याआधी ६ राशींची लॉटरी! शनि-राहू-केतूच्या गोचराने मिळणार पैसाच पैसा?

जर कुटुंबातील सदस्य कर्जाचे गॅरंटर किंवा को-बॉरोअर नसतील, तर केवळ नातेसंबंधांच्या आधारावर बँक त्यांच्याकडून वसुली करू शकत नाही. मात्र, मृत व्यक्तीच्या नावावर घर, जमीन किंवा बँकेतील पैसे यांसारखी संपत्ती असेल आणि ती वारसांना मिळाली असेल, तर त्या वारशातून मिळालेल्या संपत्तीच्या मर्यादेत कर्जाची वसुली होऊ शकते.

Bank loan after death
LPG Insurance : गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यास किती लाखांचा विमा मिळतो? ग्राहकांना माहिती आहे का?

होम लोन आणि पर्सनल लोनचे नियम वेगळे

होम लोन: घर खरेदीसाठी घेतलेल्या कर्जामध्ये संबंधित घर बँकेकडे तारण असते. कर्जदाराचा मृत्यू झाल्यानंतर हप्ते थकल्यास बँक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घराचा लिलाव करू शकते.

पर्सनल लोन: हे कर्ज सामान्यतः कोणतीही मालमत्ता तारण न ठेवता दिले जाते. कर्जदाराच्या मृत्यूनंतर बँक त्याच्या मागे राहिलेल्या संपत्तीतून थकीत रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न करू शकते.

गॅरंटर आणि को-बॉरोअर असल्यास काय?

जर पत्नी, भाऊ किंवा इतर कोणत्याही व्यक्तीने कर्जासाठी गॅरंटर म्हणून सही केली असेल, तर भारतीय करार कायदा १८७२ च्या कलम १२८ नुसार त्यांच्यावर कर्जफेडीची जबाबदारी येऊ शकते.

रिकव्हरी एजंट कुटुंबाला त्रास देऊ शकतात का?

बँकेला कर्जाची वसुली करण्याचा अधिकार असला तरी रिकव्हरी एजंट कुटुंबीयांना धमकावू शकत नाहीत, शिवीगाळ करू शकत नाहीत किंवा मानसिक त्रास देऊ शकत नाहीत. असा प्रकार घडल्यास संबंधित बँकेकडे तक्रार करता येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.