घोटाळा झाला! लालूप्रसाद यादवांचं अख्खं कुटुंब अडचणीत; राबडी, तेजस्वी, तेजप्रताप, मीसा भारतींसह ४६ जणांवर आरोपनिश्चिती

lalu yadav family land for job scam charges framed : दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टानं लालूप्रसाद यादव, राबडी देवी, तेजस्वी, मीसा भारती, हेमा आणि तेजप्रताप यादव यांच्यासह अन्य आरोपींविरुद्ध लँड फॉर जॉब घोटाळा प्रकरणात आरोप निश्चित केले आहेत. कोर्टानं ५२ आरोपींची निर्दोष सुटकाही केली.
लँड फॉर जॉब घोटाळा प्रकरणात लालूप्रसाद यादव यांच्यासह कुटुंबीयांवर आरोपनिश्चिती, दिल्ली कोर्टाचा निर्णय
लँड फॉर जॉब घोटाळा प्रकरणात लालूप्रसाद यादव यांच्यासह कुटुंबीयांवर आरोपनिश्चितीsaam tv
Published On

रेल्वेत कथित जमिनीच्या बदल्यात नोकरी देण्याच्या घोटाळा प्रकरणात लालूप्रसाद यादव यांच्यासह कुटुंबीयांच्या अडचणी वाढल्या आहेत. दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाने शुक्रवारी सीबीआयच्या आरोपपत्रात लालूप्रसाद, तेजस्वी यादव, राबडी देवी, तेज प्रताप, मीसा भारती, हेमा यादव यांच्यासह ४६ जणांविरोधात आरोप निश्चिती केली आहे. कोर्टाने शुक्रवारी हा निर्णय दिला. तसेच कोर्टाने लँड फॉर जॉब घोटाळा प्रकरणात ५२ आरोपींची निर्दोष सुटकाही केली आहे.

लँड फॉर जॉब घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यांच्यासह कुटुंबीय आणि इतरांविरोधात पीसी अॅक्ट अंतर्गत आरोप निश्चित केले आहेत. आता लालूंसह कुटुंबीयांविरोधात खटला चालवण्यात येणार आहे. दिल्लीच्या कोर्टात शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान लालूप्रसाद आणि राबडी यांच्याव्यतिरिक्त अन्य सर्व आरोपी हजर होते. बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव आणि जेजेडी अध्यक्ष तेज प्रताप यादव देखील कोर्टात हजर झाले होते.

लँड फॉर जॉब घोटाळा प्रकरणात लालूप्रसाद यादव यांच्यासह कुटुंबीयांवर आरोपनिश्चिती, दिल्ली कोर्टाचा निर्णय
Andhra Pradesh Accident Video : बाईकला वाचवताना भरधाव ट्रक दुसऱ्या लेनमध्ये घुसला, कारला धडकून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल

लालू प्रसाद यादव हे यूपीएच्या कार्यकाळात रेल्वे मंत्री असतानाचे हे प्रकरण आहे. रेल्वेमध्ये ग्रुप डीच्या पदांवर भरतीसाठी अनेक जणांकडून लालूप्रसाद यांच्या कुटुंबातील सदस्य तसेच इतर जवळच्या नातेवाईकांच्या नावावर कमी किंमतीत जमिनी खरेदी केल्या होत्या. सीबीआय या प्रकरणात चौकशी करत आहे. तर मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीकडे वेगळा तपास सुरू आहे.

१०३ पैकी ५२ आरोपींची सुटका

सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात एकूण १०३ जणांना आरोपी करण्यात आले होते. त्यातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. कोर्टाने शुक्रवारी निर्णय देताना ५२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. उर्वरित आरोपींवर आरोप निश्चिती केल्यानंतर त्यांच्याविरोधात आता खटला चालणार आहे.

लँड फॉर जॉब घोटाळा प्रकरणात लालूप्रसाद यादव यांच्यासह कुटुंबीयांवर आरोपनिश्चिती, दिल्ली कोर्टाचा निर्णय
Crime News : प्राध्यापकाचा किळसवाणा स्पर्श, क्लासमेटकडून रॅगिंग, धमकी; मनानं खचलेल्या विद्यार्थिनीनं तडफडून जीव सोडला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com