Crime News : प्राध्यापकाचा किळसवाणा स्पर्श, क्लासमेटकडून रॅगिंग, धमकी; मनानं खचलेल्या विद्यार्थिनीनं तडफडून जीव सोडला

himachal pradesh college harassment case : धर्मशाला येथील सरकारी कॉलेजमधील १९ वर्षीय विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी प्राध्यापक आणि तीन विद्यार्थिनींविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
Himachal College Girl
Himachal College Girlsaam tv
Published On

हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथील एका कॉलेजमध्ये भयंकर घटना घडली. सेकंड इयरला शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीला लैंगिक शोषण आणि रॅगिंगमुळं जीव गमवावा लागला. मानसिकदृष्ट्या खचलेल्या या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिनं मृत्यूपूर्वी व्हिडिओ रेकॉर्ड करून प्राध्यापकानं लैंगिक छळ केल्याचा आरोप केला. तसंच आणखी तीन विद्यार्थिनींनी रॅगिंग करून धमकावल्याचं सांगितलं. मुलीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी प्राध्यापकासह अन्य तीन विद्यार्थिनींविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

मृत तरुणीच्या वडिलांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित प्राध्यापक आणि इतर विद्यार्थिनींविरोधात रॅगिंग आणि लैंगिक छळ केल्याच्या आरोपांखाली एफआयआर दाखल केला आहे. मृत तरूणी ही कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिकत होती. १८ सप्टेंबरला कॉलेजच्या तीन विद्यार्थिनींनी तिला मारहाण केली. तसंच तिला धमकावलं. त्यामुळं ती मानसिकरित्या खचून गेली होती.

मृत्यूपूर्वी विद्यार्थिनीनं मोबाइलवरून स्वतःचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. त्यात तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार तिनं सांगितलं. एका प्राध्यापकाने तिला नकोसा स्पर्श केला. अनेकदा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचेही तिने व्हिडिओमध्ये सांगितले. या तरुणीच्या वडिलांनी पोलिसांत केलेल्या तक्रारीत अनेक आरोपही केले आहेत. १८ सप्टेंबर २०२५ रोजी तीन विद्यार्थिनींनी त्यांच्या मुलीची रॅगिंग केली. निर्दयीपणे तिला मारहाण केली. तसेच याबाबत कुणालाही काही बोलू नको, अशी धमकी दिली, असे तक्रारीत म्हटले आहे.

Himachal College Girl
खोपोलीत शिंदे शिवसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या; अजित पवार गटाचे सुधाकर घारे, भरत भगत यांच्यासह १० जणांवर गुन्हा

प्राध्यापक आणि विद्यार्थिनींकडून होणाऱ्या छळामुळे आमची मुलगी प्रचंड दबावाखाली होती. तिला कसली तरी भीती सतावत होती. ती मानसिक तणावाखाली होती. त्यामुळे तिची प्रकृती बिघडत गेली, असे तिचे कुटुंबीय आणि नातेवाइकांचे म्हणणे आहे. मुलीची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालल्याने तिला विविध ठिकाणच्या रुग्णालयांत उपचारासाठी दाखल केले. २६ डिसेंबरला अखेर लुधियानाच्या रुग्णालयात तिचा उपचार घेत असताना मृत्यू झाला.

मुलीची प्रकृती आणि यामुळं निर्माण झालेल्या परिस्थितीमुळं यापूर्वी तक्रार दाखल करता आली नाही, असे तिच्या वडिलांनी सांगितले. दरम्यान, मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनंतर संबंधितांवर गुन्हा नोंदवला आहे. मेडिकल रेकॉर्ड, व्हिडिओतील जबाब आणि अन्य साक्षीदारांची चौकशी करण्यात येत आहे. जी तथ्ये समोर येतील त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे कांगडाच्या पोलिसांनी सांगितले.

Himachal College Girl
Crime News: घरातून उचलून नेत केलं लग्न; नंतर मुलीचा नग्न व्हिडिओ बनवत केला व्हायरल, इन्फ्लूएंसरचं अमानवी कृत्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com