प्रयागराज जिल्ह्यातील एका इनफ्लून्सरनं अपहरण करत एका मुलीशी जबरदस्तीनं लग्न केलं त्यानंतर तिचे न्यूड फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याची घटना घडलीय. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. इन्फ्लूएंसर सध्या फरार आहे. त्याचे इंस्टाग्रामवर अडीच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यमुनानगरमधील एका मंदिर परिसरात पीडितेचे आई-वडील राहतात. १९ नोव्हेंबर रोजी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर पीडितेच्या घरी गेला. तेथे मुलीला धमकावलं आणि तिला उचलून नेलं. मुलीला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्याच्या मुलीने घरातून दोन लाख रुपये, दागिने, आधार कार्ड सुद्धा नेलं. तक्रारीनंतर इन्फ्लुएंसरचा एका व्हिडिओ व्हायरल होतोय, त्यात तो स्वतःला पळवून नेलेल्या मुलीचा नवरा असल्याचं म्हणत आहे. दोघेही एका खोलीत दिसत आहेत. तो दारूच्या नशेत असून त्या मुलीशी अश्लील वर्तन करताना दिसत आहे.
नैनी पोलिस ठाण्याचे निरीक्षक ब्रिज किशोर गौतम म्हणाले की, दोन्ही व्हायरल व्हिडिओंची चौकशी केली जातेय. आरोपीला शोधण्यासाठी तीन पथके सतत छापे टाकत आहेत.पोलीस मुलीच्या सुरक्षित सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे निरीक्षकांनी सांगितले. आरोपी आणि त्या मुलीचे मोबाईल फोन बंद आहेत. त्यांचे दोन्ही नंबरवर पाळत ठेवण्यात येत आहे. लवकरच आरोपीला अटक केली जाईल, असं पोलीस निरीक्षक म्हणालेत.
सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचे वडील हे डेअरी चालवतात. इन्फ्लुएंसर आरोपी सोशल मीडियावर स्वतःला गुंड म्हणून दाखवतो. आलिशान गाड्यांमध्ये फिरत असल्याचे व्हिडिओ बनवतो. लोकांना धमक्या देतो. त्याच्यावर याआधीही गुन्हे दाखल आहेत. इंस्टाग्रामवर त्याचे अडीच लाखांपेक्षा अधिकचे फॉलोअर्स आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.