राज्यातील कारागृह सुरक्षा व्यवस्थेची ऐशीतैशी; अधिकारी-कैद्यांची एकत्र दारू पार्टी

nashik jail Liquor Party : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजवणारा धक्कादायक प्रकार नाशिकमधून समोर आलाय. आरोपी आणि कारागृहातील अधिकाऱ्यांनी चक्क कारागृहातच दारू पार्टी केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. त्यामुळे आरोपींसोबत दारू पार्टी करणारे अधिकारी कोण आहे? कारागृह दारुचे अड्डे कसे झालेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्ट...
nashik jail news
nashik jail Liquor PartySaam tv
Published On

रोहित कदम, साम टीव्ही

राज्यातील कारागृहे दारूचे अड्डे बनताहेत की काय, अशी सध्याची परिस्थिती निर्माण झालीये. नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात जामिनावर सुटलेल्या एका अट्टल आरोपीसोबत कारागृहातील 3 उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी चक्क 'दारू पार्टी' केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणात नागरी सेवा अधिनियमाचं उल्लंघन आणि कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मस्तवाल अधिकाऱ्यांना 7 दिवसांत खुलासा करण्याचे आदेश दिलेत. विशेष म्हणजे, कारागृहातील अधिकाऱ्यांनी ज्या आरोपीसोबत पार्टी झोडलीये तो पी एल ग्रुप टोळीशी संबंधित असल्याची माहिती समोर आलीये.

nashik jail news
Pune curfew : पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; शहरात १४ दिवसांसाठी जमावबंदी, काय सुरू अन् काय बंद?

हिरालाल भामरे, अशोक मलवाड आणि जगदीश ढुमणे या तिघा तुरुंग अधिकाऱ्यांनी आरोपी गौरव मिश्रासोबत पार्टी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय.

आरोपी गौरव मिश्राने तोतया आयपीएस अधिकारी बनून अनेकांना गंडा घातला असून लाल दिव्याच्या गाडीसह शहरात पोलिसांचा एस्कॉर्ट घेऊन फिरायचा.

नाशिक पोलीस आयुक्तालयातील अनेक बड्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत गौरव मिश्रा आयपीएस अधिकारी म्हणून वावरायचा.

याच गौरव मिश्राने अनेक बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या रेल्वे पोलीस अधिकाऱ्याच्या मदतीने बदल्या केल्याची माहिती समोर आलीये.

तसंच, गौरव मिश्राने नाशिक मधील पी एल ग्रुपचा म्होरक्या प्रकाश लोंढे आणि भूषण लोंढे यांना कारागृहात मदत मिळण्यासाठी पार्टीचं आयोजन केल्याचा संशय आहे.

nashik jail news
Pune Crime News : पुणे तिथं काय उणे! आंब्याचे पैसे कोण देणार? या क्षुल्लक कारणावरून नवरा-बायकोमध्ये जोरदार हाणामारी

'साम टीव्ही'नं हे वृत्त पुराव्यासह दाखवल्यानंतर कारागृह प्रशासनानं आता या तिन्ही अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवलीये. त्यामुळे पुढील काळात या अधिकाऱ्यांवर प्रशासन योग्य ती कारवाई करेल. एकीकडे, खाकी वर्दीतल्या धाकानं सराईत गुन्हेगारांची तंतरायची, मात्र, आता तेच खाकी वर्दीतले अधिकारी आरोपींसोबत दारु पार्टीत रंगलेत. त्यामुळे कायद्याचे रक्षकच अशा पद्धतीने आरोपीच्या गळ्यात गळे घालून पार्ट्या झोडणार असतील तर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेसमोर गंभीर आव्हान उभं राहिलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com