Pune curfew : पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; शहरात १४ दिवसांसाठी जमावबंदी, काय सुरू अन् काय बंद?

Pune Section 37 Imposed : पुणेकरांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शहरातील वाढत्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर उद्या रात्रीपासून पुण्यात १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
Pune gathering ban police alert
Police personnel on alert in Pune after authorities imposed a 14-day ban on public gatherings and protests.साम टीव्ही
Published On

सचिन जाधव, पणे प्रतिनिधी

पुणे शहरात पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात राजकीय आणि सामाजिक संघटना आक्रमक झाल्या असतानाच, प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले आहे. पुणे शहरात उद्या (मंगळवारी) रात्रीपासून पुढील १४ दिवसांसाठी 'जमावबंदीचे आदेश' लागू करण्यात आले आहेत. या काळात कोणत्याही प्रकारचे मोर्चे, आंदोलने आणि सभा घेण्यास प्रशासनाने पूर्णपणे बंदी घातली आहे.

सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ च्या कलम ३७ (१) (२) (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश करण्यात आला आहे. जमावबंदी हा सर्वात जास्त वापरले जाणारे उपकलम आहे. मोर्चे, मिरवणुका, सभा बंद करता येतात. सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी लोकांच्या जमावावर निर्बंध घातले जातात हा आदेश साधारणत १५ दिवसांपर्यंत लागू राहू शकतो; पुढे वाढवण्यासाठी राज्य सरकारची मंजुरी लागते.

Pune gathering ban police alert
Accident : आंबेनळी घाटात घाटात स्कॉर्पिओ १८०० फूट दरीत कोसळली, ८ जणांचा मृत्यू; नावं आली समोर

कोणत्या गोष्टीवर बंदी?

सध्या पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे पुणे शहरात मोठ्या प्रमाणात राजकीय संघटना आणि सामाजिक संघटनांकडे आंदोलन करण्यात येते त्या पार्श्वभूमीवर आदेश काढलेत का? असा प्रश्न विचारला जातो. या आदेशानुसार नुसार शस्त्रे बाळगणे दगड, स्फोटके, लाठ्या इ. ठेवणे, भडकाऊ घोषणा, गाणी, भाषणे,सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या कृती यांवर बंदी लागू करता येते. जर एखाद्या व्यक्तीने वरील बंदीचे उल्लंघन करून शस्त्र किंवा धोकादायक वस्तू बाळगल्या तर: पोलीस त्या वस्तू जप्त करू शकतात संबंधित व्यक्तीवर कारवाई होऊ शकते.

Pune gathering ban police alert
Pune : एसटी बसने दुचाकीला चिरडले, ४ जणांचा जागीच मृत्यू, पुण्यात भयंकर अपघात

पुणे शहरात होणाऱ्या बकरी ईद तसे च इतर सण-उत्सवाचे अनुषंगाने पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखणे आवश्यक आहे.

कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, ज्वलनशील द्रव पदार्थ बरोबर नेणे.

दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.

शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे.

कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे, पुढा-यांच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

मोठयाने अर्वाच्च घोषणा देणे, सार्वजनीक टिका करणे, उच्चार गाणी गाणे, वाद्य वाजविणे.

शिष्टाचाराच्या विरोधात असणारे चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणतीही वस्तु वापरणे किंवा वस्तु तयार करणे, प्रदर्शन करणे किंवा प्रसारित करणे जेणे करुन सार्वजनिक नैतिकता किंवा सुरक्षा धोक्यात येईल किंवा राज्य उलथून टाकण्यास कारणीभूत ठरू शकेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com