मला पालकमंत्री करा...; भर सभेत शिंदेंसमोरच शरद पवारांच्या खासदाराचं मोठं विधान, घडामोडींना वेग

Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी पालकमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यास सहा महिने पालकमंत्री करा, अशी मागणीही त्यांनी केली.
NILESH LANKE WANTS GUARDIAN MINISTER POST
NILESH LANKE WANTS GUARDIAN MINISTER POSTsaam tv
Published On: 

सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असताना दुसरीकडं शरद पवार यांच्या खासदारानं मोठं वक्तव्य करत राजकीय भुवया उंचावल्या आहेत. डिलीमीटेशन बिलासाठी शरद पवार गट हा सकारात्मक असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितलंय. यामुळे आगामी काळात राजकारणात काय चित्र पाहायला मिळतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अहिल्यानगरचे खासदार नीलेश लंके यांनी पालकमंत्री होण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्या सहा महीने पालकमंत्री करा, अशी मागणीच त्यांनी केली.

NILESH LANKE WANTS GUARDIAN MINISTER POST
राज्यभर दुष्काळ, पण कोकणातील या तळीत पाण्याचा महापूर! रहस्य काय?

एवढंच नाही, तर सहा महीने गृहमंत्री करा, सगळ्यांच्या बत्या गुल केल्या नाहीत तर बघा, असं मिश्किल व्यक्तव्यही लंके यांनी केलं. मात्र गृहमंत्री नको, पालकमंत्री तरी करा असं म्हणत त्यांनी आपल्या इच्छेला आणखी एकदा दुजोरा दिला.

NILESH LANKE WANTS GUARDIAN MINISTER POST
Nandurbar Accident: घरापासून अवघे दोन किलोमीटर अंतर, पण...; भरधाव कारने १८ वर्षीय तरुणाचा जीव घेतला

जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दलल आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात नीलेश लंके बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे उपस्थित होते. त्यांच्यासमोरच लंके यांनी पालकमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली.

NILESH LANKE WANTS GUARDIAN MINISTER POST
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होणार, बड्या नेत्याच्या विधानाने राजकारणात चर्चांना उधाण

पालकमंत्री झाल्यानंतर सायरन वाजवत गाडी शिर्डीला घेऊन जायची आणि पुन्हा नगरला आणायची, एवढं जरी करता आलं तरी खूप झालं, असं ते म्हणाले. गाडीच्या पुढे-मागे लाल दिव्याच्या गाड्या असाव्यात आणि जिल्हाधिकारी डायरी घेऊन मागे-पुढे असावेत, असंही त्यांनी गंमतीशीरपणे सांगितलं. पालकमंत्री केल्यानंतर दोनदा शिर्डीला चक्कर मारली तरी चालेल, असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

दरम्यान, २०२९ मध्ये आपलं जुळेल आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल, असा विश्वासही नीलेश लंके यांनी व्यक्त केला. त्यांच्या या मिश्किल वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.