राज्यभर दुष्काळ, पण कोकणातील या तळीत पाण्याचा महापूर! रहस्य काय?

Maharashtra Drought Shebari Pond In Sindhudurg: महाराष्ट्रात दुष्काळसदृश परिस्थिती असताना मालवण तालुक्यातील गोळवण गावातील शेबारीची तळी मात्र ओसंडून वाहत आहे.
Shebari Pond in Golwan Village
Shebari Pond in Golwan Villagesaam tv
Published On: 

विनायक वंजारे, साम टीव्ही

सध्या राज्यभरात दुष्काळ निर्माण झाला असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. तर अनेक मराठवाडा, धाराशिव आणि सोलापूर जिल्हयात तर नद्या अक्षरशः कोरड्याठाक पडल्या आहेत. मात्र या दुष्काळाला कोकणातील मालवण तालुक्यामध्ये एक गाव अपवाद असल्याचे दिसून येत आहे. या भीषण परिस्थितीतही गोळवण येथील एक तळी ओसंडून वाहत आहे. विशेष म्हणजे या तळीमध्ये पाणी येते कुठून? याचा उलगडा अजूनही कोणालाच लागला नाहीये.

Shebari Pond in Golwan Village
Nandurbar Accident: घरापासून अवघे दोन किलोमीटर अंतर, पण...; भरधाव कारने १८ वर्षीय तरुणाचा जीव घेतला

तळकोकणात गावोगावी सध्या पाणीटंचाईची चिंता सतावू लागली आहे. दुष्काळसदृश परिस्थितीत पाण्याचा थेंब आणि थेंब जपण्यासाठी ग्रामस्थासोबतच प्रशासनाची धडपड सुरू असून ठिकठिकाणी कच्चे बंधारे बांधून पाणी साठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, याच दुष्काळाच्या परिस्थितीत मालवण तालुक्यातील गोळवण गावात पाण्याचा खडखडाट असताना गावातील पांडवकालीन शेबारीची तळी मात्र पाण्याने तुडुंब भरून वाहत आहे. इतकेच नाही तर तिचे पाणी पावसाळ्यातील ओढ्याप्रमाणे भरल्या तलावाप्रमाणे ओसंडून वाहत आहे. गोळवण गावातील रस्त्यालगत ही छोटीशी तळी आहे. आकाराने फार मोठी नसली तरी तिचे वैशिष्ट्य मात्र थक्क करणारे आहे.

Shebari Pond in Golwan Village
महाराष्ट्रात खळबळ! भाजपच्या महापौरांनी प्राशन केलं विष; आमदारांचा धक्कादायक खुलासा, नेमकं प्रकरण काय?

सध्या या तळीतील पाण्याची पातळी इतकी वाढलेली आहे की, पाणी काठोकाठ भरून बाहेर वाहताना दिसतेय. ही तळी बाराही महिने पाण्याने भरलेली असते. अगदी एप्रिल-मे महिन्यातही उन्हाची तीव्रता वाढलेली असतानाही नद्या- विहिरींचे पाणी आटते. त्या काळातही या तळीतील पाणी ओसंडून वाहत असते. यंदा तर दुष्काळसदृश परिस्थितीमुळे या तळीचे वैशिष्ट्य अधिकच ठळकपणे समोर आले आहे. परिसरातील काही अंतरावरील जलस्रोतांची पाणीपातळी खालावलेली असताना या तळीत मात्र दुप्पट गतीने पाणी वाहत आहे.

Shebari Pond in Golwan Village
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होणार, बड्या नेत्याच्या विधानाने राजकारणात चर्चांना उधाण

हे पाणी या तळीत नेमकं येते कुठून हा मात्र संशोधनाचा विषय ठरू शकतो. शबरीच्या तळीमागील अचूक कारण अद्याप समोर आलेले नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. या पाण्याचा पिण्यासाठी वापर केला जात नाही. मात्र पाळीव जनावरे या पाण्यावर आपली तहान भागवतात. तसेच जवळच्या जंगलातील वन्यप्राण्यांसाठीही हा जलस्रोत महत्त्वाचा ठरतो. तळीची रचनाही लक्षवेधी आहे. दगडी बांधकाम आणि पायऱ्यांची रचना असणारी ही तळी पांडवकालीन असल्याचे ग्रामस्थ सांगतात. अनेक पिढ्यांपासून या तळीचे जतन केले जात आहे. सण-उत्सवाच्या काळातही येथे पूजा केली जाते. या तळीच्या शेजारी शेबारीच्या देवाचे छोटे मंदिर देखील आहे. या देवस्थानावरूनच या तळीला शेबारीची तळी म्हणून ओळख निर्माण झाली. ग्रामस्थांच्या मते, पूर्वजांपासून या तळीत पाणी कायम पाहायला मिळते. दुष्काळ आला तरी ही तळी कधीच आटलेली नाही. त्यामुळे ती त्यांच्यासाठी केवळ पाण्याचा स्रोत नसून श्रद्धा आणि अभिमानाचे प्रतीक बनली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.