Indian Traditions : हिंदू विवाहित महिला पायाच्या दुसऱ्या बोटातच जोडवी का घालतात? जाणून घ्या यामागील खास कारण

Saam Tv

जोडवी का घालतात?

हिंदू धर्मात लग्नानंतर महिलांनी पायाच्या दुसऱ्या बोटात जोडवी घालण्याची परंपरा आहे.यामागे धार्मिक, सांस्कृतिक आणि आयुर्वेदाशी संबंधित काही मान्यता आहेत.

why wear silver toe rings | pinterest

जोडवी म्हणजे सौभाग्याचं प्रतीक

हिंदू परंपरेत जोडवीला विवाहित महिलेच्या सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. लग्नाच्या विधीदरम्यान पती पत्नीच्या पायात जोडवी घालतो. यामुळे ती विवाहित असल्याची ओळख निर्माण होते.

why wear silver toe rings | pinterest

दुसऱ्याच बोटात जोडवी घालण्यामागचे कारण?

पारंपरिक मान्यतेनुसार या बोटाचा संबंध महिलांच्या प्रजनन आरोग्याशी जोडला जातो. त्यामुळे याच बोटात जोडवी घालण्याला विशेष महत्त्व दिलं जातं.

why wear silver toe rings | pinterest

काय आहे मान्यता

आयुर्वेदाशी संबंधित काही पारंपरिक मान्यतांनुसार पायाच्या दुसऱ्या बोटातील विशिष्ट नसांचा संबंध गर्भाशयाशी असल्याचं सांगितलं जातं. जोडवीमुळे या भागावर हलका दाब निर्माण होतो आणि मासिक पाळी नियमित राहण्यास मदत होते, अशी समजूत आहे. मात्र याला ठोस वैज्ञानिक पुरावा नाही.

why wear silver toe rings | pinterest

चांदीचीच जोडवी का घातली जातात?

चांदीला शीतल धातू मानलं जातं. तसेच चांदीमुळे शरीरातील सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते, अशी धार्मिक मान्यता आहे.

why wear silver toe rings | pinterest

पायात सोन्याची जोडवी का घालत नाहीत?

सोन्याला देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे सोन्याचे दागिने कमरेखाली घालणं योग्य मानलं जात नाही. म्हणूनच पायात चांदीचे दागिने घालण्याची परंपरा प्रचलित आहे.

why wear silver toe rings | pinterest

वेगवेगळ्या भाषांमध्ये काय म्हणतात?

भारतात वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये जोडवीला वेगवेगळी नावं आहेत. हिंदीमध्ये तिला बिछिया, तेलुगूमध्ये मेट्टेलू, तर तमिळमध्ये मिन्जी किंवा मेट्टी म्हणतात. महाराष्ट्रात जोडवी हा शब्द प्रचलित आहे.

why wear silver toe rings | pinterest

फॅशन नाही,तर परंपरेचा वारसा

आज अनेक महिला जोडवीला पारंपरिक दागिना आणि फॅशन अॅक्सेसरी म्हणूनही पसंती देतात. मात्र हिंदू संस्कृतीत जोडवीला विवाहित स्त्रीच्या सौभाग्याचं आणि वैवाहिक नात्याचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे या दागिन्याला विशेष सांस्कृतिक महत्त्व आहे.

why wear silver toe rings | pinterest

NEXT : युरिक अॅसिड कमी करण्यासाठी लसूण गुणकारी आहे का? काय म्हणतात तज्ज्ञ?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garlic for Uric Acid Control | SAAM TV
येथे क्लिक करा