Uric Acid Control : युरिक अॅसिड कमी करण्यासाठी लसूण गुणकारी आहे का? काय म्हणतात तज्ज्ञ?

Saam Tv

लसूण खाणं फायदेशीर?

शरीरातील युरिक अॅसिड वाढल्यामुळे सांधेदुखी आणि गाऊटचा त्रास होऊ शकतो. अशावेळी लसूण खाल्ल्याने युरिक अॅसिड नियंत्रणात राहते का? जाणून घ्या डॉक्टरांचं मत.

garlic for uric acid | pinterest

युरिक अॅसिड का वाढतं?

शरीरात प्युरिन नावाच्या घटकाचं विघटन झाल्यावर युरिक अॅसिड तयार होतं. किडनी अतिरिक्त युरिक अॅसिड शरीराबाहेर टाकू शकत नसेल, तर रक्तातील त्याची पातळी वाढते.

garlic for uric acid | pinterest

युरिक अॅसिड कमी होतं का?

लसणामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे शरीरातील सूज आणि चयापचयाच्या आरोग्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. मात्र युरिक अॅसिड थेट कमी करण्याचा ठोस मानवी पुरावा अद्याप उपलब्ध नाही.

garlic for uric acid | pinterest

लसणातील कोणते घटक फायदेशीर?

लसणामध्ये अ‍ॅलिसिनसारखे जैविक सक्रिय घटक असतात. या घटकांवर विविध आरोग्यविषयक संशोधन झाले आहे. काही प्रयोगांमध्ये सूज कमी करण्यास आणि शरीरातील चयापचय प्रक्रिया सुधारण्यास मदत होण्याचे संकेत मिळाले आहेत.

garlic for uric acid | pinterest

लसूण उपचार नाही

लसूण हा संतुलित आहाराचा भाग असू शकतो. मात्र केवळ लसूण खाल्ल्याने युरिक अॅसिड नियंत्रणात येईल, असं समजणं चुकीचं आहे. डॉक्टरांनी दिलेली औषधं आणि उपचार यांची जागा लसूण घेऊ शकत नाही.

garlic for uric acid | pinterest

युरिक अॅसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी काय कराल?

पुरेसं पाणी प्या,संतुलित आहार घ्या,लाल मांस आणि काही सीफूडचे अतिसेवन टाळा, साखरयुक्त पेयांपासून दूर राहा. नियमित व्यायाम करा,वजन नियंत्रणात ठेवा.

garlic for uric acid | pinterest

या गोष्टी लक्षात ठेवा

लसणाचं अतिसेवन केल्यास अॅसिडिटी, छातीत जळजळ आणि पोटाचे त्रास होऊ शकतात. रक्त पातळ करणारी औषधं घेणाऱ्या व्यक्तींनी लसणाचे सप्लिमेंट्स घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.सांध्यांमध्ये वारंवार वेदना, सूज किंवा गाऊटचा त्रास होत असल्यास दुर्लक्ष करू नका.

garlic for uric acid | pinterest

टीप :

ही माहिती सामान्य आरोग्यविषयक माहितीसाठी आहे. उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

garlic for uric acid | pinterest

NEXT : दारू प्यायल्यानंतर तोंडातून दुर्गंधी येते? ही ७ कारणे जाणून घेतल्यावर व्हाल थक्क!

reason for bad breath after consuming alcohol | SAAM TV
येथे क्लिक करा