Yamuna Boat Accident in Vrindavan: वंदावनमध्ये यमुना नदीत बोटी उलटल्यामुळे १० भाविकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शुक्रवारी मथुरेतील वृंदावनमध्ये शृंगार घाटाजवळ भाविकांनी भरलेली बोट उलटली. यामध्ये १० जणांचा मृत्यू झालाय. तर १५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर अद्याप ८ ते ९ जण बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. भोटीमध्ये ३३ भाविक होते अशी माहिती मिळाली आहे. पोलीस आणि डायव्हिंग पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व भाविक पंजाबधून बांके बिहारीला भेट देण्यासाठी आले होते.
स्थानिक प्रसारमाध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार, यमुना नदीत बोट उलटल्याची दुर्घटना घडल्यानंतर तात्काळ बचावपथकाने धावा घेतली. पोलिसांनी गर्दी नियंत्रणात आणली तर बचावपथकाकडून मदतकार्य सुरू करण्यात आले. बचावपथकाने आतापर्यंत २५ जणांना पाण्याबाहेर काढले आहेत. त्यामधील १५ जणांना प्राथमिक उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. १० जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. उर्वरित ८ जणांना शोध घेतला जात आहे.
मथुरेचे जिल्हाधिकारी चंद्र प्रताप सिंह यांनी दुर्घटनेबाबत दुख व्यक्त केले. ते म्हणाले की, 'या अपघातात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. १५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. बचाव पथके इतरांचा शोध घेत आहेत. लुधियानाहून ३२ भाविक वृंदावनमधील बांके बिहारी दर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर ते यमुना नदीत सफरीसाठी गेले होते. पण त्याचवेळी शृंगार घाटाजवळ बोट नदीत उलटली.'
दरम्यान, शृंगार घाटावर बचावकार्य वेगात सुरू आहे. पण सध्या त्या ठिकाणी मोठ्या संख्येने स्थानिकांनी गर्दी केली आहे. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांच मोठा बंदोबस्त तैणात कऱण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या अपघाताची दखल घेतली आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त केला आहे.
शृंगार घाटावरील स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना शुक्रवारी दुपारी शृंगार घाटावर घडली. पंजाबहून यात्रेकरूंना घेऊन जाणारी एक बोट पुलाला धडकून उलटली. घाटावर स्नान करणाऱ्या लोकांनी हा अपघात पाहिला. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस आणि डायव्हिंग टीम घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी बचावकार्य सुरू केले. एनडीआरएफ आणि एसडीआरएफदेखील बचावकार्यात मदत करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.