उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील नूरपूर परिसरात कारला भीषण आग
मेरठ-पौडी महामार्गावरील देवल गावाजवळ ही घटना घडली
भाजपचे माजी आमदार लोकेन्द्र सिंह चौहान यांची कार आगीत जळून खाक
कारमध्ये पल्लवी सिंह आणि कुबेर सिंह प्रवास करत होते
उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील नूरपूर परिसरात मेरठ-पौडी महामार्गावर एक धक्कादायक घटना घडली. देवल गावाजवळून जात असलेल्या भाजप नेत्याच्या कारला अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली. मात्र, गाडीतील दोघांनी प्रसंगावधान राखत वेळीच बाहेर उडी मारल्याने त्यांचे प्राण वाचले.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे माजी आमदार लोकेन्द्र सिंह चौहान यांचे मोठे बंधू चंद्रप्रकाश सिंह यांच्या मालकीची ही नवीन स्कॉर्पिओ कार होती. घटनेच्या वेळी चंद्रप्रकाश सिंह यांच्या पत्नी पल्लवी सिंह आणि चालक कुबेर सिंह हे दोघे गाडीतून प्रवास करत होते.
मेरठ-पौडी महामार्गावरून जात असताना देवल गावाजवळ अचानक गाडीला आग लागली. सुरुवातीला गाडीतून धूर निघू लागला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच गाडीतील दोघांनी तातडीने बाहेर उडी मारली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. काही क्षणांतच आगीने संपूर्ण गाडीला आपल्या विळख्यात घेतले. आग इतकी भीषण होती की, काही वेळातच नवीन स्कॉर्पिओ पूर्णपणे जळून खाक झाली. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेत सुदैवाने पल्लवी सिंह आणि चालक कुबेर सिंह यांना कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, नवीन गाडी जळून नष्ट झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. धावत्या वाहनाला अचानक आग लागण्याच्या या घटनेमुळे वाहनचालकांनी प्रवासादरम्यान सुरक्षित ठिकाणी थांबून योग्य ती खबरदारी घेणे किती महत्त्वाचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.