Shreya Maskar
पेण (जिल्हा रायगड) परिसरात फिरण्यासाठी काही सुंदर ऐतिहासिक किल्ले आहेत. तुम्ही थंडगार वातावरणात मित्रांसोबत येथे विकेंड ट्रिप प्लान करू शकता.
पेण तालुक्यातील निदवली परिसरात सांकशी हा डोंगरी किल्ला आहे. शांत वातावरण, निसर्गरम्य दृश्ये आणि छोटा ट्रेक यासाठी ओळखला जातो. माथ्याजवळ काही खडकाळ चढाई आहे.
रायगड जिल्ह्यातील जंगलातून जाणारा ट्रेक आणि किल्ल्याचे अवशेष हे माणिकगड किल्ल्याचे आकर्षण आहे. हिवाळ्यात निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी उत्तम पर्याय आहे.
कर्नाळा पक्षी अभयारण्यातून किल्ल्याकडे जाणारा जंगलातील ट्रेक हे खास आकर्षण आहे. किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४५ मीटर उंचीवर आहे.
पाली गावाजवळील सरसगड हा डोंगरी किल्ला खडकाळ चढाई, पायऱ्या आणि आजूबाजूच्या डोंगरांचे दृश्य यासाठी प्रसिद्ध आहे. पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरासोबत भेट देता येते.
समुद्रकिनाऱ्याजवळील डोंगरावर असलेला कोर्लई हा ऐतिहासिक किल्ला पाहायला नक्की जा. समुद्राचे विहंगम दृश्य, दीपगृह परिसर आणि शांत वातावरणासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.