India Alliance  Saam Tv
देश विदेश

India Aghadi: इंडिया आघाडीत नेतृत्वावरून फूट? राहुल गांधींच्या नेतृत्वाला ममतादीदींचं आव्हान

Mamata Banerjee Challenge To Rahul Gandhi: देशातील मोदींची सत्ता उलथवून लावण्यासाठी एकत्र आलेल्या इंडिया आघाडीत दीड वर्षांतच फूट पडणार असल्याची शक्यता दिसत आहे. नेमकं काय कारण घ्या जाणून...

Priya More

स्नेहिल झणके, साम टीव्ही

देशातील विरोधी पक्षांची इंडिया आघाडी फूटीच्या उंबरठ्यावर आहे. राहुल गांधींच्या नेतृत्त्वावर थेट ममता बॅनर्जींनी सवाल उपस्थित केल्यानंतर इंडिया आघाडीचं पुढे काय होणार असा प्रश्न उपस्थित झालाय. विशेष म्हणजे यात ठाकरे गटानंही उडी घेत ममता बॅनर्जींना पाठिंबा दर्शवलाय. नेमकं असं काय घडलं इंडिया आघाडीत हे आपण जाणून घेणार आहोत....

देशातील मोदींची सत्ता उलथवून लावण्यासाठी एकत्र आलेल्या इंडिया आघाडीत दीड वर्षांतच फूट पडणार असल्याची शक्यता दिसत आहे. इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसनं इंडिया आघाडीच्या नेतृत्त्वावर सवाल उपस्थित करत थेट इंडिया आघाडीचं नेतृत्त्व करण्यास ममता बॅनर्जी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे.

'मी इंडिया आघाडीची स्थापना केली होती. आता आघाडीचं नेतृत्त्व करण्याऱ्यांवर ती नीट चालवण्याची जबाबदारी आहे. ते चालवत नसतील, तर मी काय करु शकते? जर मला संधी दिली तर मी इंडिया आघाडी व्यवस्थित काम कशी करेल याकडे लक्ष देईन. बंगालबाहेर जाण्याची माझी इच्छा नाही, पण मी इथून नेतृत्त्व करु शकते.', असं ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

ममता बॅनर्जींनी थेट इंडिया आघाडीच्या नेतृत्त्वावरुन राहुल गांधींवर निशाणा साधला. यात आता ठाकरे गटानं देखील उडी घेतली आहे. ममता बॅनर्जींनी इंडिया आघाडीचं नेतृत्व करावं अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसची चांगलीच अडचण झाली आहे. आता काँग्रेस नेमकी काय भूमिका घेतेय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हरियाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निकालानंतर इंडिया आघाडीतील मतभेद प्रकर्षानं समोर आलेत आणि म्हणूनच सोमवारी झालेल्या संसदेबाहेरील अदानींविरोधातील इंडिया आघाडीच्या आंदोलनात देखिल तृणमूल, सपा आणि आम आदमी पार्टी दूर राहिल्याचं दिसलं. निवडणूकीच्या आधी इंडिया आघाडीतून नितीशकुमार बाहेर पडले. तर लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीत असून देखील आप आणि तृणमूलनं पंजाब आणि पश्चिम बंगालमध्ये स्वतंत्र निवडणुका लढवत स्वत:ची ताकद दाखवली. त्यामुळे इंडिया आघाडीतील घटक पक्षांचा राहुल गांधींच्या नेतृत्त्वावर विश्वास उरला नाही का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

Fake Charger: मोबाईल चार्जर खरे आहे का बनावट? खरेदी करताना ‘हे’ तपशील नक्की तपासा

Deepika Padukone Fitness: प्रेग्नेसीनंतर दीपिका पादुकोण इतकी फिट कशी? पाहा आताचे नवीन फोटो

Bank Rule: ग्राहकांना दिलासा! किमान बॅलेंस नसेल तरीही भरावा लागणार नाही दंड; या बँकांचा मोठा निर्णय

Mhada Home: खुशखबर! म्हाडाची बंपर लॉटरी, फक्त ५ लाखांमध्ये घर; नेमकं कुठे? अर्ज भरण्याची अंतिम तारीख कोणती?

SCROLL FOR NEXT