Mamata Banerjee: मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देणार राजीनामा? केलं मोठं वक्तव्य; काय म्हणाल्या? वाचा...

West Bengal Doctors Protest News in Marathi : मी राजीनामा देण्यास तयार आहे, असं वक्तव्य ममता बॅनर्जी यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देणार राजीनामा? केलं मोठं वक्तव्य; काय म्हणाल्या? वाचा...
Mamata BanerjeeSaam Tv
Published On

Mamata Banerjee offers to resign as CM: कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये गेल्या महिन्यात प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी कनिष्ठ डॉक्टरांनी पुकारलेला संप अद्यापही सुरूच आहे. यातच राज्य सरकारने संपावर गेलेल्या डॉक्टरांना चर्चा करण्यास बोलवलं होतं. मात्र आजही राज्य सरकार आणि संपकरी डॉक्टरांमध्ये कोणतीही चर्चा झाली नाही.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संपकरी डॉक्टरांशी चर्चा करण्यासाठी दोन तास वाट पाहिली, मात्र डॉक्टर चर्चेला आले नाहीत. या गोंधळावर ममता बॅनर्जी यांनी लोकांच्या हितासाठी आपण राजीनामा देण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देणार राजीनामा? केलं मोठं वक्तव्य; काय म्हणाल्या? वाचा...
Maharashtra Politics : राज्यात राजकीय कुटुंबामध्ये भूकंप, कुणा-कुणाची घरं फुटणार? वाचा

काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत की, "जनतेच्या हितासाठी मी राजीनामा द्यायला तयार आहे. मलाही आरजी कर हॉस्पिटलच्या डॉक्टरच्या हत्येप्रकरणी न्याय हवा आहे. ज्यांना आशा होती की, आरजी कर प्रकरणातील आंदोलन आज संपेल, त्यांची मी माफी मागते." दरम्यान, बैठकीचे लाइव्ह स्ट्रिमिंग करण्याची मागणी करत संपकरी डॉक्टरांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत बैठक घेण्यास नकार दिला होता.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ''आजही आम्ही कनिष्ठ डॉक्टरांना भेटण्यासाठी दोन तास थांबलो. मात्र ते बैठकीच्या ठिकाणी आले नाहीत.'' यासोबतच त्यांनी सांगितले की, आरजी कर प्रकरणातील तणाव संपवण्यासाठी कनिष्ठ डॉक्टरांशी बोलण्याचा तीनदा प्रयत्न केला.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देणार राजीनामा? केलं मोठं वक्तव्य; काय म्हणाल्या? वाचा...
Mumbai Coastal Road: मरीन ड्राइव्ह ते वांद्रे ट्रॅफिक फ्री प्रवास; नवीन कोस्टल रोडबद्दल जाणून घ्या A टू Z माहिती

ममता बॅनर्जी म्हणाल्या, “आमच्याकडे कनिष्ठ डॉक्टरांसोबतच्या बैठकीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची व्यवस्था होती, आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीने ते त्यांच्याशी शेअर करू शकलो असतो. मात्र आरजी कर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. यामुळे त्यांच्यासोबत बैठकीचे थेट प्रक्षेपण करता येणार नाही.'' कनिष्ठ डॉक्टरांनी काम बंद केल्यामुळे उपचाराअभावी 27 जणांचा मृत्यू झाला असून राज्यभरातील सात लाख रुग्ण त्रस्त आहेत, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com