Maharashtra Politics : राज्यात राजकीय कुटुंबामध्ये भूकंप, कुणा-कुणाची घरं फुटणार? वाचा

Maharashtra Political News : धर्माराव बाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्रामने शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि वडीलांविरोधातच थेट मैदानात उतरणार असल्याचं स्पष्ट झालंय.. मात्र आत्राम यांचं घराणंचं नाही तर राज्यातील आणखी घराणे फुटण्याची शक्यता आहे. ही घराणी कोणती आहेत? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....
राज्यात राजकीय कुटुंबामध्ये भूकंप, कुणा-कुणाची घरं फुटणार? वाचा
Maharashtra Politics Saam tv
Published On

भरत मोहोळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय घराण्यांना फुटीचं ग्रहण लागलंय. त्यातच अजित पवारांच्या पक्षाचे मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवारांच्या पक्षाची तुतारी फुंकली आणि अहेरीत बाप विरुद्ध लेक लढत होणार हे स्पष्ट झालंय.. तर दुसरीकडे अजित पवारांनी घर फुटण्याबाबत केलेल्या आवाहनाचाही भाग्यश्री आत्रामांनी समाचार घेतला आहे.

भाग्यश्री आत्राम यांच्या शरद पवार गटाच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांवर अजित पवार यांनी भाष्य केलं होतं. 'घर फुटू देऊ नका, माझी चूक झाली, असं भाष्य अजित पवार यांनी केलं होतं. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर भाग्यश्री आत्राम यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. 'बाबांविरोधात लढा म्हणाले तेव्हा घर फुटणार नव्हते का? असा सवाल भाग्यश्री आत्राम यांनी केला होता.

राज्यात राजकीय कुटुंबामध्ये भूकंप, कुणा-कुणाची घरं फुटणार? वाचा
Maharashtra Politics : रणनिती तीच, चेहरे नवे; साखरपट्ट्यात शरद पवारांची खेळी, ८६ जागांवर टाकला डाव!

राज्यातील राजकीय भूकंपानंतर शरद पवारांनी राजकीय डाव टाकायला सुरुवात केलीय. त्यातच पवार आणि ठाकरेंनी थेट शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांच्या घरातील नाराज सदस्यांना आपल्याकडे घेण्याची रणनीती आखलीय. यामध्ये कुणाची घरं फुटण्याची शक्यता आहे? पाहूयात.

कुणाची घरं फुटणार?

दिंडोरी

नरहरी झिरवळांचा मुलगा गोकूळ झिरवळ तुतारी फुंकण्याची शक्यता

सांगोला

तानाजी सावंतांचा पुतण्या अनिल सावंत तुतारी फुंकण्याची शक्यता

खेड-दापोली

रामदास कदमांचा पुतण्या अनिकेत कदमांच्या हाती मशाल

पाचोरा

शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांची चुलत बहीण वैशाली पाटलांच्या हाती मशाल

पुसद

अजितदादांच्या पक्षाचे इंद्रनील नाईकांचे भाऊ ययाती नाईक तुतारी फुंकण्याची शक्यता

राज्यात राजकीय कुटुंबामध्ये भूकंप, कुणा-कुणाची घरं फुटणार? वाचा
Maharashtra Politics : अजित पवार गटाकडून नाराज नेत्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू; मुंबईत बैठक होणार, पाहा VIDEO

राजकीय घराण्यातील फूट महाराष्ट्राला नवी नाही. आतापर्यंत मुंडे, ठाकरे, पवारांसारखी मोठी घराणी फुटली होती. त्याचे राजकीय पडसादही उमटले. मात्र आता तरुण फळी सोबत घेत पवार आणि उद्धव ठाकरेंनी मोर्चेबांधणी केलीय. त्याचा विधानसभेला फायदा होणार की नाही? याकडे लक्ष लागलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com