MVA Protest News: मालवण घटनेविरोधात मविआचा एल्गार! शरद पवार, उद्धव ठाकरे रस्त्यावर, राज्यभर 'जोडे मारो' आंदोलन; VIDEO

Mahavikas Aghadi Protest Live Updates: महाविकास आघाडीकडून राज्य सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, नाना पटोले यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित आहेत.
MVA Protest News
Mahavikas Aghadi Protest Live Updates: Saamtv
Published On

मुंबई, ता. १ सप्टेंबर २०२४

MVA Jode Maro Andolan News: मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनाप्रकरणी आज महाविकास आघाडीकडून राज्य सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, नाना पटोले, शाहू महाराज छत्रपती यांच्यासह मविआचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी हुतात्मा चौकात दाखल झाले आहेत. इथून महाविकास आघाडीचा मोर्चा गेटवे ऑफ इंडिया येथे धडकणार आहे. दुसरीकडे राज्यातही विविध ठिकाणी मविआने आंदोलन पुकारले आहे.

मविआचे राज्यभर जोडे मारो आंदोलन!

मालवणमधील घटनेचा निषेध करण्यासाठी मुंबईसह राज्यभरात आज महाविकास आघाडीच्या नेत्यांने जोडे मारो आंदोलन सुरू केले आहे. मुंबईमधील गेट वे ऑफ इंडिया परिसरात हे आंदोलन सुरु असून उद्धव ठाकरे, शरद पवार (Sharad Pawar), शाहू महाराज छत्रपती, संजय राऊत खासदार सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड यांच्यासह मविआचे सर्व नेते आणि पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. यावेळी शिवाजी महाराज यांची मूर्ती हातात घेऊन मविआच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

शरद पवार, उद्धव ठाकरे रस्त्यावर

दुसरीकडे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी १० पासून गेट वे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. गेट वे ऑफ इंडिया येथून पर्यटकांना बाहेर काढले आहे. यावेळी जय शिवाजी जय भवानी, महाराज आम्हाला माफ करा, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेल्याचे पाहायला मिळाले. हुतात्मा चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन मविआच्या आंदोलनाला सुरूवात झाली.

MVA Protest News
Maharashtra Politics: महायुतीची महाबैठक! CM शिंदे, फडणवीस अन् अजित पवारांमध्ये ४ तास खलबतं; बैठकीत काय काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी

छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा!

छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकातही महाविकास आघाडीने जोडो मारो आंदोलन केले. तर त्याचठिकाणी भाजपकडूनही आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला सर्व केंद्र, प्रदेश, शहर, मंडळ, वॉर्ड, मोर्चा, आघाडी, प्रकोष्टचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या आंदोलनादरम्यान, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचे फोटो असलेले पोस्टर झळकावल्याने वाद झाल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांनी हे पोस्टर तात्काळ ताब्यात घेतले. यावेळी पोलीस आणि मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली.

नांदेडमध्येही मविआचे आंदोलन!

राज्य सरकारच्या विरोधात राज्यभरात महाविकास आघाडीचे जोडे मारो आंदोलन सुरू आहे. आज नांदेडमध्ये देखील महाविकास आघाडीने जोडे मारो आंदोलन केले. विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत भर पावसात हे आंदोलन करण्यात आले. नांदेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले.

MVA Protest News
Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! आयशर- ट्रॅव्हल्सची धडक; १५ प्रवासी जखमी, २ गंभीर

संजय राऊतांची टीका

"महाविकास आघाडीच्या या आंदोलनावर भाजप नेत्यांनी टीका केली होती. या टीकांचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार समाचार घेतला. महायुतीचे नेते मूर्ख आहेत. पोलिसांनी परवानगी जरी दिली नसती तरीसुद्धा आम्ही आंदोलन केले असते. आम्ही बघतोय पोलिसांची परवानगी नसतानाही जनतेचा रोष आहे. आज फक्त निषेध करत आहोत, महाराज असते तर कडेलोट केला असता," असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला.

नाना पटोले काय म्हणाले?

तसेच "आम्ही पोलिसांची परवानगी नसताना मोर्चा काढलेला आहे. महाराजांचा अपमान होतो हीच आमच्यासाठी दुर्दैवी बाब आहे, त्याच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहे. शाहू महाराज छत्रपती आणि शरद पवार तब्येत ठीक नसतानाही याठिकाणी दाखल झाले आहेत," असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सरकारवर तोफ डागली.

MVA Protest News
Nandurbar Crime: बाप आहे की हैवान! १३ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, असा झाला घटनेचा उलगडा

फडणवीसांचा मविआला टोला!

दरम्यान, महाविकास आघाडीचे आंदोलन नौटंकी असल्याची टीका करत भाजप नेत्यांनीही या आंदोलनाला आंदोलनाने उत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आणि शिवभक्तांची क्षमा मागितली, तरीही महाविकास आघाडीचे नतं भ्रष्ट नेते राजकारण करून निवडणुकीच्या काळात अराजकता पसरविण्याचे प्रयत्न करत आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

अमरावतीत भाजपचे आंदोलन!

मविआच्या जोडे मारो आंदोलनाला भाजपने अमरावतीच्या राजकमल चौकात आंदोलनाने उत्तर दिले,याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ठेवून यावेळी मविआ विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या,यावेळी उद्धव ठाकरे,शरद पवार, नाना पटोले, आदित्य ठाकरे सह मविआ नेत्यांचे फोटो हातात घेत मविआ नेत्यांचा निषेध नोंदवला यावेळी मविआने यात राजकारण करू नये असा इशारा भाजपाने दिला

MVA Protest News
Police Recruitment: वर्दीचं स्वप्न अधुरं राहिलं, पोलीस भरतीच्या शारिरीक चाचणीवेळी १० उमेदवारांचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com