रुपाली बडवे| मुंबई, ता. १ सप्टेंबर २०२४
मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला धारेवर धरले आहे. आज राजकोट किल्ल्यावरील या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून जोडो मारो आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला जाणार आहे. दुसरीकडे मविआच्या या आंदोलनाला भाजपही आंदोलनाने उत्तर देणार आहे, त्यामुळे आज राज्यात पॉलिटिकल ड्रामा पाहायला मिळणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण येथील पुतळा कोसळल्याचा निषेध म्हणून राज्य सरकारच्या विरोधात आज महाविकास आघाडी जोडो मारो आंदोलन करणार आहे. महाविकास आघाडीच्या आजच्या "जोडे मारा"आंदोलनला अद्यापही परवानगी मिळाली नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांना पोलीस परवानगीची प्रतीक्षा आहे, मात्र परवानगी जरी मिळाली नाही तरी आज ठरवल्याप्रमाणे हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यादरम्यान हे आंदोलन केले जाणार आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून तिन्ही पक्षातील सर्व प्रमुख नेते यामध्ये सहभागी होणार आहेत. या आंदोलनासाठी खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्यासह राज्यभरातील मविआचे नेते मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. दुसरीकडे भाजपही महाविकास आघाडीच्या आंदोलनाला उत्तर देणार आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हुतात्मा स्मारक आणि गेट वे ऑफ इंडिया या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबई पोलीस, राज्य राखीव पोलीस, दंगल नियंत्रण पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल, दहशतवाद विरोधी पथक, सर्वाइलांस वॅन कंट्रोल करणारे पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत. महाविकास आघाडीच्या मोर्च्यात एकूण जवळपास 5 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.