Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मविआचे महायुतीला धक्के? दर आठवड्याला 2 पक्षप्रवेश ? 12 बड्या नेत्यांना वाटते भारी, पवारांची तुतारी?

Assembly Election 2024 : महाराष्ट्रात सत्ता बदलाची वातावरणनिर्मिती केली जात असून महायुतीविरोधी लाट तयार करण्यासाठी मविआ आता धक्कातंत्राचा वापर करणार आहे. समरजितसिंह घाटगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 3 सप्टेंबरला प्रवेश होणार आहे.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam Digital
Published On

महाराष्ट्रात सत्ता बदलाची वातावरणनिर्मिती केली जात असून महायुतीविरोधी लाट तयार करण्यासाठी मविआ आता धक्कातंत्राचा वापर करणार आहे. समरजितसिंह घाटगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 3 सप्टेंबरला प्रवेश होणार आहे. त्यानंतर मविआत दर आठवड्याला किमान दोन पक्षप्रवेश होणार असल्याची माहीती सुत्रांकडून मिळतेय...मात्र हे पक्ष प्रवेश पक्षपातळीवर करायचे की मविआचा संयुक्त कार्यक्रमात करायचे याबाबत विचार सुरू आहे.

सर्वाधिक पक्षप्रवेश शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होणार असल्याचं बोललं जातंय. अजित पवारांच्या राष्ट्रावादीतल्य़ा विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या ठिकाणच्या भाजपचे इच्छुक अस्वस्थ आहेत. यातलं असंच एक मोठं नाव आहे हर्षवर्धन पाटलांचं सध्या जरी हर्षवर्धन पाटलांनी उमेदवारीचा चेंडू फडणवीसांच्या कोर्टात टाकला असला तरी त्यांच्यासारखे महायुतीतले 12 बडे नेते पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याच्या तयारी आहेत. यातले बहुतांश नेते पश्चिम महाराष्ट्रातील आहेत.

महायुतीत अस्वस्थ असलेले सर्वाधिक नेते तुतारी वाजवण्यासाठी उत्सुक का?

त्या त्या मतदारसंघांमधील राजकीय समीकरणं कारणीभूत आहेत.

एखाद्या नेत्याच्या माध्यमातून काँग्रेस प्रवेश केल्यास दुसरा पक्षांतर्गत विरोधक टार्गेट करण्याची भीती आहे.

लोकसभा निवडणुकीतलं घवघवीत यश पाहून अनेकांना पवारांची भुरळ पडलीय.

निलेश लंके, बजरंग सोनवणे अजित पवारांना सोडून गेल्यानंतर खासदार झाले. त्यामुळे 83 व्या वर्षीही पवार चमत्कार करू शकतात असा नेत्यांना विश्वास वाटतो.

Maharashtra Politics
Vadhavan Port : वाढवण बंदरामुळे मोठा 'घोळ'; समुद्रातलं 'सोनं' लुप्त होणार?

अजित पवारांना महायुतीत घेतल्यापासून भाजपचा कोअर कार्यकर्ता नाराज आहे. त्यात भाजप जागावाटपाची चर्चा सुरू करत नसल्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रचंड अस्वस्थता आहे. अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे, अतुल बेनके यांच्यासह आणखी चार आमदार पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. त्यामुळे जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यास जेवढा उशीर होणार तेवढी पवारांची रणनीती यशस्वी होणार. शरद पवारांच्या याच डावपेचांमुळे सर्वाधिक नेत्यांना पवारांच्या गाडीत बसण्याची इच्छा आहे.

Maharashtra Politics
Palghar Crime News : महाराष्ट्र हादरवणारी घटना ; एकाच घरात आई-वडील आणि मुलीचा मृतदेह आढळला, नेमकं काय घडलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com