Maharashtra Politics : रणनिती तीच, चेहरे नवे; साखरपट्ट्यात शरद पवारांची खेळी, ८६ जागांवर टाकला डाव!

Assembly Election 2024 : नाशिकपासून कोल्हापूरपर्यंत पसरलेल्या साखर पट्ट्यात सध्या पवारांकडे केवळ ७ आमदार आहेत, त्यामुळे शरद पवारांनी नवी रणनिती आखली असून महायुतीला धक्का देण्याच्य तयारीत आहेत.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam Digital
Published On

संदीप गावडे, साम टीव्ही

भाजपच्या उदयानंतर आणि अजित पवारांनी साथ सोडल्यानंतर कमकुवत झालेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला लोकसभा निवडणुकीतील यशाने नवी दिशा मिळाली. मात्र साखर पट्ट्यातील राजकारणात दबदबा असलेल्या पवारांसोबत सध्याच्या घडीला काही मोजकेच आमदार आहेत. २८८ जागांपैकी ३० टक्के जागा असलेल्या आणि नाशिकपासून कोल्हापूरपर्यंत पसरलेल्या हा समृद्ध साखरपट्टा पवारांना यावेळी साथ देणार का? ८३ वर्षीय पवारांना विधानसभेची ही निवडणूक राजकीय पुनरुत्थानाची संधी देणार का? काय आहे नेमकी परिस्थिती पाहूयात एक रिपोर्ट...

८३ व्या वर्षीही पवार महाराष्ट्र पिंजून काढतायेत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार महाराष्ट्राच्या साखर पट्ट्यातील राजकारणाचा महत्त्वाचा चेहरा मानले जातात. उत्तर महाराष्ट्रातील नाशिकपासून पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरपर्यंत पसरलेल्या या भागात, सहकारी साखर कारखान्यांच्या माध्यमातून विकासाची नांदी झाली. पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर आणि नाशिक या सात जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या या पट्ट्यात ८६ विधानसभा मतदारसंघ येतात, ज्यामध्ये राज्याच्या २८८ पैकी सुमारे ३० टक्के जागा आहेत. पक्षफूटीनंतर अजित पवारांसोबत २६ आमदार गेले आहेत तर शरद पवारांकडे केवळ आमदार आहेत. पक्षाची बिघडेली ही घडी बसवण्यासाठी आणि राजकीय वारसा पुन:स्थापित करण्यासाठी पवार प्रयत्नशील आहेत. त्यासाठीच ते या वयातही प्रत्येक मतदारसंघ पिंजून काढत आहेत. कोणत्याही राजकीय विचारसरणीची पर्वा न करता संभाव्य उमेदवारांची ओळख करून देत आहेत. नवीन चोहऱ्यांचा शोध घेत आहेत.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी पक्षात झालेल्या फुटीमुळे पवारांसाठी पर्यायांची संधी वाढली आहे. जेव्हा बहुतेक आमदारांनी अजित पवारांसोबज जाणं पसंत केलं, त्याचवेळी नवीन चेहऱ्यांचा शोध घेण्याची संधी मिळाली. अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करूनही ज्यांना विधानसभा निवडणुकीत लढण्याची संधी मिळू शकली नाही, ते आता संभाव्य उमेदवार बनले आहेत. त्यामुळे पक्षात एक नवा बदल पहायला मिळत आहे.

देवदत्त निकम यांनाअंबेगावमधून संधी?

पुणे जिल्ह्यातील अंबेगाव मतदारसंघातील दिलीप वळसे पाटील हे सात वेळा आमदार राहिले आहेत. राष्ट्रवादीने त्यांच्यापलीकडे विचार केला नव्हता कारण ते पवार यांचे विश्वासू सहकारी होते. पण जेव्हा त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला, तेव्हा शरद पवार यांनी देवदत्त निकम यांच्यावर लक्ष केंद्रित केलं. निकम हे अंबेगावमधील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे १० वर्षे अध्यक्ष होते. राजकारणात निकम नवीन नाहीत. २०१४ मध्ये त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. ते पक्षाचं काम करत राहिले, आणि आता त्यांना विधानसभेसाठी संधी मिळण्याची शक्यता आहे.

Maharashtra Politics
9/11 Special Story : ४५४६ विमानांनी उड्डाण भरलं अन् काही मिनिटात ४ हायजॅक; 9/11 च्या हल्ल्यातील फ्लाईट ९३ ची अंगावर काटा आणणारी स्टोरी, वाचा सविस्तर

कोल्हापुरात भाजपचा बडा नेता राष्ट्रवादीत

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदारसंघात पवार यांनी भाजपचे नेते राजे समरजीतसिंह घाटगे यांना पक्षात घेतलं आहे. घाटगे यांनी मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध अपक्ष म्हणून लढून ८८,००० हून अधिक मते मिळवली होती. मुश्रीफ आता सत्ताधारी आघाडीत मंत्री आहेत. पवार यांनी घाटगे यांना उमेदवारी दिली असून मतदारसंघात बदलाची गरज असल्याचं म्हटलं आहे.

वैभव पिचड यांना डावलून भांगरेंची निवड

अहमदनगर जिल्ह्यात अकोले विधानसभा मतदारसंघातून अमित भांगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक भांगरे यांचे पुत्र आहेत. पवार यांनी वैभव पिचड यांना डावलून भांगरे यांची निवड केली आहे. कारण २०१९ च्या निवडणुकीत पिचड यांचा पराभव झाला होता. मतदारांच्या पसंतीत कोणताही बदल झालेला नाही असा पवारांना विश्वास आहे.

साखरपट्ट्यात २०१९ मध्ये जिंकल्या होत्या ३३ जागा

२०१४ मध्ये विधानसभा विवडणुकीत राष्ट्रवादीने ४१ जागा जिंकल्या होत्या, त्यातील २३ जागा साखर पट्ट्यातील होत्या. २०१९ मध्ये काँग्रेससोबतच्या आघाडीतून राष्ट्रवादीने १२५ जागांवर लढवल्या आणि ५४ जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी ३३ जागा साखर पट्ट्यात निवडून आल्या होत्या. साखर कारखान्यांशी निगडित उमेदवारांना निवडणुकीत यश मिळवणं सोपं जाते, कारण समाजात त्यांची एक मजबूत प्रतिमा निर्माण झालेली असते. त्यामुळेच पवार यांनी निकम, घाटगे आणि भांगरे यांना उमेदवार म्हणून निवडले आहे, जे थेट सहकारी क्षेत्राशी संबंधित आहेत.

के. पी. पाटील यांची पुन्हा पवारांकडे धाव

कोल्हापूरमधील राधानगरी मतदारसंघातून माजी आमदार के. पी. पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. पाटील यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता, पण त्यानंतर ते पुन्हा शरद पवार गटात परतले आहेत. महायुतीतील अनेक भाजप नेते, ज्यांना अजित पवार यांच्या उपस्थितीमुळे जागा मिळण्याची शक्यता कमी आहे, त्यांनी शरद पवार यांच्याकडे धाव घेतली आहे. शिवसेनेच्या प्रकाश आंबिटकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असताना ते पुन्हा पवार गटात परतले आहे.

भाजपचे नेते शरद पवार गटाच्या वाटेवर

अजित पवार महायुतीसोबत गेल्यामुळे आणि तिकीट मिळण्याची शक्यता कमी असलेल्या अनेक भाजप नेत्यांनी पवारांकडे धाव घेतली आहे. माजी आमदार बापूसाहेब पाथारे, जे २०१९ मध्ये भाजपमध्ये गेले होते, ते शरद पवार गटात परतण्याची शक्यता आहे आणि त्यांना पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. पुण्यातील आणखी एक भाजप नेते हर्षवर्धन पाटील भाजपकडून कोणतंही ठोस आश्वासन मिळत नसल्यामुळे इंदापूर मतदारसंघातून शरद पवार गटाकडून लढण्याची शक्यता आहे. एशरद पवार यांनी गेल्या निवडणुकीत पक्षफुटीच्या नकारात्मक परिणामावर स्वार होऊन विजय मिळवला होता. तेच आगामी निवडणुकीतही घडू शकते, असा विश्वास एका राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केला आहे.

बहुतेक उमेदवारांची पडताळणी

खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार यांनी साखरपट्ट्यातील बहुतेक उमेदवारांची पडताळणी केली आहे. ओळख निश्चित केली आहे. पवार गटात अतिशय वेगाने घडामोडी घडतायेत, संपूर्ण साखर पट्ट्यातील सर्व मतदारसंघांमधील संभाव्य उमेदवारांची राजकीय ताकद, सामाजिक प्रतिमा, आणि जनसंपूर्क यांची त्यांना कल्पना आहे. जिल्ह्यांमध्येच नव्हे तर त्यांनी अनेक मतदारसंघांना अनेक वेळा भेट दिल्या आहेत. निर्णय घेण्याआधी त्यांनी यावेर खूप चिंतन केलं आहे, असं पवार यांच्या एका सहकाऱ्याने सांगितलं. ८३ वर्षांचे पवार यांना त्यांचे सर्वात विश्वासू सहकारी जयंत पाटील यांचं समर्थन आहे. जयंत पाटील राज्यात पक्षाचं नेतृत्व करत आहेत. जयंत पाटील यांच्याच प्रयत्नामुळे राष्ट्रवादीचे माजी आमदार बबाजानी दुर्रानी, घाटगेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

Maharashtra Politics
Explainer : मंकीपॉक्स खरंच मासांहारातून पसरतो का? पोलिओशी काय आहे संबंध? वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com