
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएमविरोधीत आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने ईव्हीएमविरोधात अनोखं आंदोलन केलं आहे. ठाकरे गटाचे पदाधिकारी ईव्हीएम होडीतून घेऊन गेले. त्यानंतर ते ईव्हीएममशीन समद्रात बुडवले. या आंदोनाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना ठाकरे गटाकडून ईव्हीएमच्या विरोधात मुंबईत आंदोलन केलं. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ईव्हीएमच्या प्रतिकृतीचं अरबी समुद्रात विसर्जन केलं. ईव्हीएम विसर्जित केले नाही, तर लोकशाही विसर्जित होईल. प्रगत देशात ईव्हीएम नाही मग भारतात का? ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा, असं म्हणत ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं.
शिवसेना ठाकरे गटाचे राज्य संघटक अखिल चित्रे यांच्याकडून ईव्हीएमविरोधात आंदोलन करण्यात आलं आहे. सध्या सत्ताधारी आणि विरोधक ईव्हीएच्या मुद्यावरून आमने सामने आहेत. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यावरून राजकीय वातावरण तापलं आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीतील काँग्रेसनेही ईव्हीएमच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. सांगलीमध्ये काँग्रेसच्या वतीने ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी ईव्हीए हटाव, देश बचाव असा नारा देत आंदोलन करण्यात आलं. तसेच ईव्हीएम हटावसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु करण्यात आली आहे. काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वात स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ झाला.
सांगली शहरातून एक लाखांची स्वाक्षरी मोहीम या निमित्ताने राबवण्यात आली. निवडणूक आयोगाने ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच महाविकास आघाडीच्या माध्यमातून या विरोधातला लढा भविष्यात आणखी तीव्र केला जाईल,असा इशारा देखील यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिला आहे. महाविकास आघाडीच्या मागण्यांपुढे सरकार काय निर्णय घेणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.