Congress Leader Vishvendra Singh Sama Tv News
देश विदेश

Political News: काँग्रेसला हादरा! बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

Congress Leader Vishvendra Singh: राजस्थानमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला. काँग्रेसच्या बड्या नेत्याने तडकाफडकी राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Priya More
  • राजस्थानमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली

  • काँग्रेसचे नेते विश्वेंद्र सिंह यांनी राजीनामा दिला

  • विश्वेंद्र सिंह यांचा गोविंद सिंह डोटासरा यांच्यावर निशाणा

  • भरतपूर काँग्रेसमधील अंतर्गत वादानंतर विश्वेंद्र सिंह यांचा राजीनामा

राजस्थानच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसच्या बड्या नेत्याने तडकाफडकी राजीनामा दिला. भरतपूरचे ज्येष्ठ नेते विश्वेंद्र सिंह यांनी काँग्रेस पक्षाची अचानक साथ सोडली. पक्षांतर्गत कलहामुळे त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे. पक्षाला रामराम ठोकताना विश्वेंद्र सिंह यांनी फेसबुकवर भलीमोठी पोस्ट करत पक्ष सोडण्यामागचे कारण सांगितले आहे. पक्षांतर्गत वादावर नाराजी व्यक्त करत त्यांनी हे पाऊल उलल्याचे सांगितले आहे. बड्या नेत्याने साथ सोडल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

काही दिवसांपूर्वी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गोविंद डोटासरा आणि विश्वेंद्र सिंह यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली होती. ज्यानंतर डोटासरा यांनी विश्वेंद्र सिंह यांच्या विरोधात एक अहवाल सादर केला होता. तेव्हापासून त्यांना पक्षातून काढून टाकण्याची तयारी सुरू होती. महापालिका निवडणुकीतील पक्षाच्या पराभवासाठी विश्वेंद्र सिंह यांनी तिकीट वाटपाला जबाबदार धरले होते. त्यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांच्यावर आरोप करत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

माजी कॅबिनेट मंत्री विश्वेंद्र सिंह यांनी फेसबुक पोस्टद्वारे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांवर निशाणा साधला आहे. त्यांनी लिहिले, 'भरतपूर-दीग काँग्रेसची वाताहत - जबाबदार कोण?" त्यांनी पुढे लिहिले, 'नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवाला एकच कारण आहे - दोन्ही जिल्हाध्यक्षांनी आपल्या मर्जीतील लोकांना तिकीट दिले आणि खऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला सारले. जनतेने त्यांना धडा शिकवला आहे. पहिल्या नगरपालिका निवडणुकीत या लोकांनी जनतेला त्यांच्याच कबरीत गाडले होते पण जनता अजूनही तयार आहे.'

तसंच, यावेळी, जनता दोन्ही जिल्हाध्यक्षांना आणि त्यांना वाचवणारे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांना एकाच कबरीत गाडायला तयार आहे. हा मुख्यमंत्र्यांचा गृहजिल्हा आहे. येथे काँग्रेस मजबूत असायला हवी होती पण या लोकांनी पक्षाची वाट लावली आहे. प्रदेशाध्यक्ष बहिरे-मुके झाले आहेत. जोपर्यंत हे दोघे सत्तेत आहेत तोपर्यंत काँग्रेसची प्रगती होणे अशक्य आहे. प्रदेशाध्यक्षांनो जरा भानावर या.'. असे आवाहन विश्वेंद्र सिंह यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO New Rules: 25 हजार रुपयांपर्यंतच्या पगारावर PF अनिवार्य; कर्मचाऱ्यांना काय होणार फायदा?

Maharashtra News Live Update: कोपरगावात ‘नो UPI डे’; MDR शुल्काच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांचे गांधीगिरी आंदोलन

Thane News: पूर्णकर प्रकरणावरून आरोप होणाऱ्या शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, थेट ठाकरेंवरच केला गंभीर आरोप

Pitru Paksha: पितृ पक्षात हे 3 संकेत मिळणं फारच अशुभ; पितर नाराज असल्याची असतात लक्षणं

Lip Balm: कोरडे आणि फुटलेले ओठ होतील मऊ-गुलाबी; घरच्या घरी बनवा नॅचरल लिप बाम

SCROLL FOR NEXT