'रामायण' ५ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रदर्शित
'रामायण' चित्रपटाची आठ दिवसांत १००० कोटी पार कमाई
'रामायण' चित्रपटात रणबीर कपूर प्रभू रामाच्या भूमिकेत
रणबीर कपूरचा 'रामायण: राईज ऑफ अ लेजेंड' (Ramayana: Rise of a Legend) चित्रपट रिलीज होऊन आता एक आठवडा पूर्ण झाला आहे. रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांची मुख्य भूमिका असलेला हा पौराणिक चित्रपट जागतिक स्तरावर १,००० कोटी रुपयांच्या कमाईचा आकडा ओलांडून गेला आहे. आता या चित्रपटाची एकूण कमाई १,०३३.५५ कोटी रुपयांवर पोहोचली असून, असा टप्पा गाठणारा हा ११ वा भारतीय चित्रपट ठरला आहे. 'रामायण' ५ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रदर्शित झाला असून, दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे बोले जात आहे.
'रामायण'चा 'दंगल', 'बाहुबली २', 'पुष्पा २' आणि 'धुरंधर २' सारख्या यशस्वी भारतीय चित्रपटांच्या यादीत समावेश झाला आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'रामायण'ने गुरुवारी म्हणजे रिलीजच्या ८ व्या दिवशी भारतात ५३.५० कोटी रुपयांची नेट कमाई केली, तर परदेशातील बाजारपेठांतून २५ कोटी रुपयांची भर पडली. चित्रपटाची जागतिक एकूण कमाई १,०३३.५५ कोटी रुपये झाली असून, त्यापैकी ६७५.०५ कोटी रुपये भारतातून आले आहेत. देशांतर्गत नेट कमाई ५६४.६० कोटी रुपये आहे, तर परदेशातील बाजारपेठांतून ३५८.५० कोटी रुपयांचे योगदान मिळाले आहे.
'रामायण'च्या हिंदी आवृत्तीने देशांतर्गत बाजारपेठेत आपले वर्चस्व कायम राखले असून, १९,४६४ शोमधून ४३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यानंतर कन्नड आवृत्तीचा क्रमांक लागतो, ज्याने ९२२ शोमधून ३.२५ कोटी रुपयांची कमाई केली. मल्याळम आवृत्तीने ९७७ शोद्वारे २.८० कोटी रुपयांची कमाई केली, तेलुगू आवृत्तीने १,७८३ शोमधून २.३० कोटी रुपयांची कमाई केली, तमिळ आवृत्तीने ८९६ शोमधून २.१५ कोटी रुपयांचे योगदान दिले.
'रामायण' हा दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा भव्य पौराणिक चित्रपट असून, वाल्मिकी रामायणावर आधारित दोन भागांच्या सिनेमॅटिक मालिकेतील हा पहिला भाग आहे. या चित्रपटात रणबीर कपूरने प्रभू श्रीराम, साई पल्लवीने सीता आणि यशने रावणाची भूमिका साकारली आहे. तर रवी दुबे लक्ष्मण आणि सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसत आहेत. अयोध्येतील राजकारण, कैकेयीचे वरदान, श्रीरामांचा १४ वर्षांचा वनवास, सीतेचे अपहरण आणि राम-रावण संघर्षाची सुरुवात असा या चित्रपटाचा कथाविस्तार आहे. नमित मल्होत्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, नितेश तिवारी यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. भव्य व्हिज्युअल इफेक्ट्स आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तंत्रज्ञानामुळे हा चित्रपट विशेष चर्चेत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.