Tiger Shroff Firing : बॉलिवूडमध्ये खळबळ! टायगर श्रॉफच्या शूटर्सच्या निशाण्यावर कपूर घराण्याची 'ही' व्यक्ती, घराची केली होती रेकी

Tiger Shroff Firing Case Update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. हल्लेखोरांनी टायगर श्रॉफच्या आधी कपूर खानदानातील एक सदस्याला टार्गेट केले होते.
Tiger Shroff Firing Case Update
Tiger Shroff FiringSAAM TV
Published On: 
Summary

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ

टायगर श्रॉफ आधी बॉलिवूडचे अनेक कलाकार हल्लेखोरांच्या निशाण्यावर

हल्लेखोरांनी कलाकारांच्या घराची केली होती रेकी

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. हल्लेखोरांनी टायगर श्रॉफआधी बॉलिवूडच्या अनेक बड्या कलाकारांना टार्गेट केल्याची माहिती समोर आली आहे. यात सलमान खान, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि आमिर खान यांच्या नावांचा समावेश आहे. हल्लेखोरांनी टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार करण्याआधी या कलाकारांची घराची रेकी केली होती. यात आता आणखी एका अभिनेत्याचे नाव जोडले जात आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांनी अभिनेता रणबीर कपूरच्या वांद्रे येथील घराची देखील रेकी केली होती. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, टायगर श्रॉफवर झालेला हल्ला बिश्नोई टोळीचा साथीदार अनिल पंडित याच्या सांगण्यावरून करण्यात आला होता. या प्रकरणात आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली असून, पोलीस या कटाचा तपशील, शस्त्रास्त्रांचा पुरवठा आणि यात सहभागी असलेल्या व्यक्तींच्या भूमिकेची चौकशी करत आहेत.

गोळीबारात सामील असलेल्या तीन मुख्य आरोपींना बुधवारी राजस्थानमधील कोटा येथून मुंबईत आणण्यात आले आणि त्यांना ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तीनही हल्लेखोर सुरुवातीला सलमान खानला लक्ष्य करणार होते. मुंबईत आल्यानंतर त्यांनी सलमानच्या निवासस्थानाची रेकीही केली होती, परंतु तिथे पोलिसांचा बंदोबस्त पाहून त्यांनी तो बेत रद्द केला.

Tiger Shroff Firing Case Update
Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवं वळण! सलमान खानसह ४ बड्या अभिनेत्यांच्या घरांची रेकी, मुंबईतील 'या' व्यक्तीने केली मदत

आरोपींना फॅन पोस्ट्स आणि इंस्टाग्राम पेजेसवरून समजले की, टायगर श्रॉफ दर रविवारी मुंबईतील जुहू परिसरातील फुटबॉल खेळायला जातो आणि तिथे त्याची सुरक्षा व्यवस्था मर्यादित असते, त्यामुळे हल्लेखोरांनी टायगर श्रॉफला टार्गेट केले, त्याच्या गाडीवर गोळीबार केला. बॉलिवूडचे आणखी कोणते स्टार्स हल्लेखोरांच्या निशाण्यावर होते, याचा तपास पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com