मुंबईत भीषण आगीचा थरार! एकापाठोपाठ एक ५ सिलिंडरचे स्फोट; नागरिकांमध्ये प्रचंड दहशत

Sakinaka fire news today : मुंबईतील साकीनाका येथील पाइपलाइन परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, आगीत ४ ते ५ गॅस सिलिंडरचे स्फोट झाले असून अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
Sakinaka fire news today
Sakinaka fire news today
Published On: 

संजय गडदे, साम टीव्ही प्रतिनिधी

Gas Cylinder Explosion : मुंबईतील साकीनाका परिसरातील पाइपलाइन भागात एक भयंकर दुर्घटना घडली आहे. अचानक लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीच्या या घटनेत ४ ते ५ गॅस सिलिंडरचे स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. परिसरात धुराचे लोळ पसरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, साकीनाका येथील पाइपलाइन परिसरात अचानक आग भडकली. आग नेमकी कशामुळे लागली, याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, आगीच्या या दुर्घटनेत गॅस सिलिंडरचे एकापाठोपाठ एक स्फोट झाल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात तीव्र धुराचे लोट पसरले.

Sakinaka fire news today
Weather Update:पुन्हा बिघडणार हवामान! बंगालच्या उपसागरात 'लो प्रेशर' तयार; सलग ६ दिवस मुसळधार पाऊस अन् वादळाचा इशारा

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ६ गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. या दुर्घटनेत जिविताहानीबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही धाव घेत गर्दीवर नियंत्रण मिळवले.

Sakinaka fire news today
Ladki Bahin Yojana: दिवाळीत होणार डबल धमाका? लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३,००० जमा होणार?

दरम्यान, या भीषण आगीत नेमके कशा प्रकारचे नुकसान झाले आहे आणि कोणी जखमी झाले आहे का, याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सिलिंडरचे स्फोट का झाले? आग कशी लागली? याचा तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com