Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

Haryana Politics: हरियाणाच्या रोहतकमध्ये भयंकर घटना घडली. काँग्रेस भवनाबाहेर महिला नेत्याच्या नवऱ्याचा कारमध्ये मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू
Congress BhavanSaam Tv
Published On: 
  • रोहतक काँग्रेस भवनाबाहेर वकिलाचा मृतदेह आढळला

  • काँग्रेस भवनाबाहेर कारमध्ये वकिलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

  • प्रदीप नारा यांच्या डोक्याला गोळी लागल्याचे दिसून येतेय

  • प्रदीप नारा मृत्यू प्रकरणात हत्या की आत्महत्या याचा पोलिस तपास करत आहेत

हरियाणाच्या रोहतकमध्ये एक खळबळजनक घटना घडली. रोहतकमधील काँग्रेस भवनाबाहेर एका कारमध्ये वकिलाचा मृतदेह आढळून आला. मृत व्यक्तीची ओळख माजी नगरसेविका दीपिका नारा यांचे पती प्रदीप नारा अशी पटली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. घटनाची माहिती मिळताच पोलिस आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना आत्महत्येबाबतची माहिती मिळाली होती. घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांच्या टीमला कारमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या व्यक्तीच्या कपाळावर गोळी लागल्याची जखम होती. पोलिसांनी घटनास्थळावरून एक परवानाधारक रिव्हॉल्वरदेखील जप्त केले. त्यांनी घटनास्थळावरून आवश्यक पुरावे गोळा केले आहेत. ही आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पण मृताच्या कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे.

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू
Pune Crime: रांजणगावात पुन्हा रक्तरंजित हल्ला; कोयता, दगड अन् फायटरने तरुणांना बेदम मारहाण

वकिलाच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. या घटनेनंतर, पोलिसांनी आजूबाजूचा परिसर सील केला आणि तपास सुरू केला. फॉरेन्सिक टीमने कारच्या आतून आणि आजूबाजूने संभाव्य पुरावे गोळा केले. घटनेपूर्वी आणि नंतरच्या घडामोडींची माहिती मिळवण्यासाठी पोलिस जवळपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेजचीही तपासणी करत आहेत.

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू
Crime: कॉलेजला गेली पण परत घरी आलीच नाही, तरुणीसोबत जे घडलं ते ऐकून कुटुंबीय हादरले

रोहतक शहराच्या एका महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या भागात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास आत्महत्या आणि हत्या या दोन्ही दृष्टिकोनातून करत आहेत. मृत वकिलाच्या मोबाईल फोन, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांचीही तपासणी केली जात आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस येईल. या घटनेमुळे सध्या परिसरात खळबळ उडाली.

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू
Baramati Crime: बारामती हादरली! मध्यरात्री २ महिलांसोबत भयंकर घडलं, घरातील दृश्य पाहून सर्वजण घाबरले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com