Bribe Case : गृहमंत्रालयातील २ अधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, FCRA प्रकरणात लाच मागितल्याचा आरोप

Home Ministry FCRA Registration Bribe Case : FCRA नोंदणी आणि परवाना नूतनीकरणासाठी कथित लाच मागितल्याप्रकरणी गृह मंत्रालयातील दोन अधिकाऱ्यांना दिल्लीमध्ये ताब्यात घेण्यात आले. प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
Two MHA Officials Held In FCRA Bribery Case
Two MHA Officials Held In FCRA Bribery Case AI Image
Published On: 
Summary
  • FCRA प्रकरणात २ MHA अधिकारी ताब्यात

  • 28 सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये कारवाई

  • FCRA नोंदणी करण्यासाठी लाचेची मागणी केल्याचा आरोप

केंद्रीय गृह मंत्रालयातील दोन अधिकाऱ्यांना लाचखोरीच्या आरोपात ताब्यात घेतल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विदेशी नियमन कायदा म्हणजेच FCRA अंतर्गत एखाद्या संस्थेची नोंदणी करून देण्यासाठी तसेच लायसन्स रिन्यू करण्याच्या बदल्यात लाच मागितल्याचा या दोन्ही अधिकाऱ्यांवर आरोप आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने केंद्रीय यंत्रणांच्या सहकार्याने ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.

गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २८ सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये दोन अधिकाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले. यामध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा आणि एका अकाउंटंटचा समावेश आहे. यापैकी एक अधिकारी MHA Foreigners Division मध्ये काम करत आहे. तर दुसरा अधिकारी Payroll and Accounts Office मध्ये काम करतो , यापूर्वी तो Foreigners Division मध्ये देखील काम करत होता.

Two MHA Officials Held In FCRA Bribery Case
Bribe Case : मुंबईत २ बड्या अधिकाऱ्यांना अटक, २ लाखांची लाच घेताना ACB ने रंगेहात पकडलं

प्राथमिक चौकशीत दोन्ही अधिकारी काही संस्थांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. FCRA अंतर्गत नोंदणी आणि लायसन्स रिन्यूसाठी मदत करण्याच्या बदल्यात लाचेची मागणी केली. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कायदेशीर तसेच विभागीय कारवाई केली जाणार असल्याचे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Two MHA Officials Held In FCRA Bribery Case
Political News : इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी राहुल गांधींना झटका! थलपति विजय यांनी घेतला मोठा निर्णय

दरम्यान, गृह मंत्रालयाने भ्रष्टाचाराविरोधातील या प्रकरणानंतर FCRA संदर्भातील सर्व सेवा अधिकृत FCRA पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन उपलब्ध असल्याचे सांगितले. कोणत्याही मध्यस्थ, एजंट किंवा व्यक्तीला FCRAसाठी मदत करण्याचे अधिकृत अधिकार देण्यात आलेले नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिक आणि संस्थांनी अशा व्यक्तींपासून सावध राहण्याचे आवाहन मंत्रालयाने केले आहे.

Two MHA Officials Held In FCRA Bribery Case
Cancer : धूम्रपान करत नाहीत तरीही होतोय कॅन्सर, महिलांनो तुमच्या घरात दडलंय याचं उत्तर

याच पार्श्वभूमीवर FCRA दुरुस्ती विधेयक २०२६ चीही चर्चा सुरू आहे. या विधेयकावर काम करणाऱ्या ३१ सदस्यीय संयुक्त संसदीय समितीसमोर गृह आणि कायदा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी विधेयकातील तरतुदी आणि बदलांची कारणे मांडली. भाजप खासदार संजय जायसवाल यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com