Bribe Case : मुंबईत २ बड्या अधिकाऱ्यांना अटक, २ लाखांची लाच घेताना ACB ने रंगेहात पकडलं

Mumbai Bribe Case News : हॉटेलच्या फायर सर्टिफिकेटसाठी २ लाखांची लाच मागितल्याचा आरोप. मुंबई ACBच्या सापळ्यात अग्निशमन दलातील अमोल मुळीक अटकेत, तर अरुण देवाळेलाही ताब्यात घेण्यात आले.
Mumbai Bribe Case News
Mumbai Bribe Case NewsAI Image
Published On: 
Summary
  • हॉटेलच्या फायर सर्टिफिकेटसाठी २ लाख रुपये लाच मागितली

  • मुंबई अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांवर कारवाई

  • ACB ने, २९ सप्टेंबर रोजी सापळा रचून कारवाई केली

  • २ जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या

संजय गडदे, मुंबई

हॉटेलच्या फायर परवान्यासाठी लाच मागितल्याच्या आरोपावरून मुंबई अग्निशमन दलातील दोन केंद्र अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केली आहे. हॉटेलला फायर सर्टिफिकेट देण्यासाठी तब्बल 2 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप संबंधित अधिकाऱ्यांवर आहे. तडजोडीनंतर 1 लाख 50 हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचे ठरल्याचे ACBच्या कारवाईत निष्पन्न झाले. या प्रकरणात अमोल मुळीक (केंद्र अधिकारी, मुंबई अग्निशमन दल, फोर्ट) याला ACBने रंगेहाथ पकडून अटक केली आहे. तर अरुण देवाळे (केंद्र अधिकारी, मेमनवाडा फायर स्टेशन) यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

ACBच्या माहितीनुसार, तक्रारदाराने हॉटेलच्या फायर परवान्यासाठी यापूर्वीच ६० हजार रुपये दिले होते. याशिवाय फायर सर्टिफिकेटसाठी ऑनलाइन ९ हजार रुपयांचे टोकनही भरले होते. मात्र, परवानगीची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी आणखी पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे.

Mumbai Bribe Case News
Cancer : धूम्रपान करत नाहीत तरीही होतोय कॅन्सर, महिलांनो तुमच्या घरात दडलंय याचं उत्तर

सुरुवातीला २ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्यानंतर तडजोड होऊन १ लाख ५० हजार रुपये देण्याचे ठरल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार उर्वरित ८० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अमोल मुळीक याला ACBच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ACBच्या दाव्यानुसार, आरोपी अरुण देवाळे यांच्या सांगण्यावरून आरोपी अमोल मुळीक याने ही रक्कम स्वीकारली. या प्रकरणात दोन्ही आरोपींचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. २९ सप्टेंबर रोजी मुंबई ACBच्या पथकाने ही सापळा कारवाई केली.

Mumbai Bribe Case News
Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

कारवाईनंतर दोन्ही आरोपींच्या घरांची झडती घेण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या झडतीत आणखी काही महत्त्वाचे पुरावे हाती लागतात का, याकडे तपास यंत्रणांचे लक्ष आहे. दरम्यान, या प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमातील कलम ७ अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती ACBकडून देण्यात आली आहे. मुंबई अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांविरोधातील या कारवाईमुळे संबंधित विभागात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com