Gokul Milk : ग्राहकांसाठी मोठी बातमी! अमूल आणि मदर डेअरीनंतर आता गोकुळ दूधही महागणार?

Gokul Milk Price Hike News : गोकुळ दूध ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! अमूल आणि मदर डेअरीनंतर गोकुळ दूधही महागण्याची शक्यता आहे. नव्या कार्यकारिणीच्या बैठकीत दूध दरवाढीवर चर्चा होणार.

राज्यातील दूध ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. अमूल आणि मदर डेअरीनंतर आता गोकुळ दूधही महाग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे रोज दूध खरेदी करणाऱ्या ग्राहकांना लवकरच अधिक पैसे मोजावे लागू शकतात.

गोकुळ दूध संघाकडून विक्री दरात वाढ करण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे, उद्या होणाऱ्या नव्या कार्यकारिणीच्या पहिल्याच बैठकीत या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत दूध दरवाढीबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गोकुळच्या दूध विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय झाल्यास त्याचा परिणाम दूध उत्पादक शेतकऱ्यांवरही होणार आहे. कारण ग्राहकांकडून दूध विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार करून दूध उत्पादकांना दिल्या जाणाऱ्या दरातही वाढ करावी लागणार आहे.

याआधी अमूल आणि मदर डेअरीने दूध दरात वाढ केल्याने ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. आता गोकुळनेही दरवाढ केली, तर ग्राहकांच्या मासिक खर्चात आणखी भर पडू शकते. मात्र, गोकुळच्या दूध दरात नेमकी किती वाढ होणार आणि ही वाढ कधीपासून लागू होणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे उद्याच्या बैठकीकडे दूध उत्पादकांसह ग्राहकांचेही लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.