Strong earthquake strikes near Mindanao, triggering tsunami alerts across multiple Asian coastal regions. saam tv
देश विदेश

भल्या पहाटे ८.२ तीव्रतेच्या भूकंपाने जमीन हादरली, 'या' देशाला त्सुनामीचा इशारा

8.2 Earthquake Jolts Southeast Asia: रविवारी रात्री भूतान आणि भारतातील काही भागात भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर आता आणखी एका देशात सोमवारी सकाळी भूकंप झाला आहे.

Omkar Sonawane

अशिया खंडात भूकंपाचे धक्के बसल्यानंतर अनेक देशांमध्ये विनाशकारी त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी रात्री भूतान आणि भारतातील काही भागात भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर आता आणखी एका देशात सोमवारी सकाळी भूकंप झाला आहे. दक्षिण-पूर्व आशियातील फिलिपिन्सच्या काही भागांमध्ये सोमवारी सकाळी अतिशय तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले. रिक्टर स्केलवर या भूकंपची तीव्रता 8.2 इतकी नोंदवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपाचे केंद्र फिलीपिन्समधील मिंडानाओ बेटाजवळ होते. या शक्तिशाली भूकंपानंतर लगेचच फिलीपिन्स, इंडोनेशिया आणि जपानसह आशियातील अनेक किनारी भागांमध्ये त्सुनामीचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. युनायटेड स्टेट्स जिओलॉजीकल सर्वे आणि जर्मन रिसर्च फॉर जिओसायन्स यांच्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार सकाळी 7.40 वाजता हा भूकंप झाला. भूकंपाचे धक्के शेजारील इंडोनेशिया नॉर्थ सुलावेसी आणि नॉर्थ मालुक प्रांतातही जाणवले.

फिलीपिन्सच्या भूकंप विज्ञान संस्थेने दक्षिणेकडील किनारी भागात राहणाऱ्या नागरिकांना तात्काळ उंच ठिकाणी स्थलांतर करण्याचा आणि समुद्रकिनाऱ्यापासून दूर सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले आहे. काही किनारी भागांमध्ये 3 मीटरपर्यंत उंच त्सुनामीच्या लाटा उसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय इंडोनेशिया, मलेशिया, तैवान, गुआम, पापुआ न्यू गिनी आणि पश्चिम प्रशांत महासागरातील अनेक देश व भागांमध्येही त्सुनामीच्या लाटा पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

इमारतीना तडे, काहीजण बेशुद्ध

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, फिलिपिन्समधील अलाबेल येथील पोलीस प्रमुख बेजी एंचेटा यांनी सांगितले की, भूकंपानंतर काही इमारतींमध्ये तडे एले आहेत. सध्या कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र तीव्र धक्क्यामुळे काही नागरिक बेशुद्ध पडल्याचे सांगण्यात आले आहे. एंचेटा म्हणाले, आम्ही आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली भूकंप अनुभवला आहे.

फिलीपिन्स हा देश जगातील नैसर्गिक आपत्तींच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील देशांपैकी एक आहे. याचे कारण म्हणजे तो प्रशांत महासागरातील ‘रिंग ऑफ फायर’ या भूकंपीय क्षेत्रात स्थित आहे. या भागात वारंवार भूकंप होतात तसेच अनेक ज्वालामुखीही सक्रिय आहेत. तसेच या ठिकाणी दरवर्षी येथे 20 पेक्षा जास्त वादळे आणि चक्रीवादळे येतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dategad Fort: दातेगडच्या कातळात कोरलेली तलवारीच्या आकाराची विहीर; या अनोख्या रचनेमागचं रहस्य नेमकं काय?

Video : माकडीण दारूच्या दुकानात गेली, व्होडकाची बाटली फोडली अन् घटाघटा प्यायली, नंतर जे घडलं ते पाहून सगळेच शॉक

Siddharth Jadhav: रहस्यमय प्रवास अन् निस्सीम भक्ती; 'बजरंगी'मधील सिद्धार्थ जाधवचा जबरदस्त लुक पाहिलात का?

Guava vs Banana: पेरू की केळी? कोणतं फळ खाल्ल्याने मिळतं जास्त पोषण

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरेंची विजयकुमार घाडगेंच्या उपोषणाला भेट

SCROLL FOR NEXT