Indonesia Earthquake: शक्तिशाली भूकंपाने इंडोनेशिया हादरलं, त्सुनामी येणार का? काय आहे वैज्ञानिकांचा अंदाज?

Indonesia Earthquake News: इंडोनेशियाच्या पापुआच्या पूर्वेकडील भागात रविवारी पहाटे शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. मात्र गंभीर नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचं कोणतही वृत्त नाही.
Indonesia Earthquake
Indonesia EarthquakeSaam Digital
Published On

Indonesia Earthquake

इंडोनेशियाच्या पापुआच्या पूर्वेकडील भागात रविवारी पहाटे शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. मात्र गंभीर नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचं कोणतही वृत्त नाही. पापु्आ प्रांतातीची राजधानी जयपुरा येथील अबेपुराच्या इशानेकडे १६२ किमी अंतरावर भूकंपाचं केंद्र होतं. ६.५ तीव्रतेचा भूकंप आला होता, मात्र त्सुनामीचा कोणताही धोका नसल्याची माहिती भूविज्ञान शास्त्रज्ञांनी दिली.

अबेपुरा इंडोनेशियातील सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या शहरांपैकी एक आहे. फेब्रुवारीमध्ये या भागात मोठा भूकंप आला होता. यावेळी तरंगणारे रेस्टॉरंट समुद्रात कोसळून चार लोकांचा मृत्यू झाला होता. इंडोनेशियात २७० दशलक्षहून अधिक लोकसंख्येचा एक विशाल द्वीपसमूह आहे. रिंग ऑफ फायर वर याचे स्थित हा द्वीपसमूह असल्यामुळे वारंवार भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Indonesia Earthquake
China Red Army: रेड आर्मीचे ९ वरिष्ठ अधिकारी तडकाफडकी बडतर्फ? काय आहे ड्रॅगनची रणनीती? जगाच्या नजरा खिळल्या चीनवर

21 नोव्हेंबर रोजी झालेल्या ५.६ तीव्रतेच्या भूकंपात पश्चिम जावाच्या सियांजूर शहरात ३३१ लोकांचा मृत्यू झाला होता आणि ६०० लोक जखमी झाले होते. तर २०१८ मध्ये सुलावेसीमध्ये आलेल्या भूकंपात आणि त्सुनामीत सुमारे ४,३४० लोक मारले गेले होते. २००४ मध्ये हिंदी महासागरात आलेल्या भूकंपामुळे त्सुनामी आली ज्यामुळे डझनभर देशांमध्ये २३०००० हून अधिक लोक मारले गेले. त्यापैकी बहुतेक इंडोनेशियाच्या आचे प्रांतातील लोकांचा समावेश होता.

Indonesia Earthquake
Punjab News: महिलेला बिल देणं कॉफी कंपनीला पडलं महागात; ५ रुपयाचा पेपर कप पडला ११,००० रुपयात

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com