Attack On Minister: कॅबिनेट मंत्र्यावर जीवघेणा हल्ला, ताफ्यावर दगडफेक अन्...; राजकारणात खळबळ

Cabinet Minister arun shankar prasad Attacked: बिहारमध्ये कॅबिनेट मंत्र्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. मंत्र्यांच्या ताफ्यावर दगडफेक देखील करण्यात आली.
Attack On Minister: कॅबिनेट मंत्र्यावर जीवघेणा हल्ला, ताफ्यावर दगडफेक अन्...; राजकारणात खळबळ
Bihar Attack On Minister:Saam Tv
Published On
  • बिहारमधील मधुबनी येथे धक्कादायक घटना

  • मंत्री अरुण शंकर प्रसाद यांच्यावर जीवघेणा हल्ला

  • ताफ्यावर दगडफेक करण्यात आली

  • काही स्थानिकांनी ताफ्यावर दगडफेक केल्याचा आरोप

बिहारमध्ये मंत्र्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारच्या मधुबनीमध्ये ही घटना घडली. बिहार सरकारच्या श्रम संसाधन आणि कौशल्य विकास विभागाचे मंत्री अरुण शंकर प्रसाद यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. त्यांच्या ताफ्यातील एका वाहनाचे नुकसान झाले. या घटनेमुळे बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी तणावाचे वातावरण होते. मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कलुआही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील थाहर गावात घडली. मंत्री आपल्या मतदारसंघातील अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहून परत येत असताना काही स्थानिक नागरिकांनी त्यांच्या ताफ्यावर दगडफेक केली. खजौली पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या थाहर गावात ही घटना घडली.

Attack On Minister: कॅबिनेट मंत्र्यावर जीवघेणा हल्ला, ताफ्यावर दगडफेक अन्...; राजकारणात खळबळ
First Deputy Chief Minister: महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते ? जाणून घ्या त्यांच्याविषयी

थाहर गावात नुकताच एका रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी गेले असता हल्ला झाल्याचा दावा आमदार आणि मंत्री अरुण शंकर प्रसाद यांनी केला आहे. थाहर गावातील जुगे ठाकूर यांचा मुलगा कृष्ण कुमार ठाकूर याचा अपघातात मृत्यू झाला होता. पीडित तरुणाच्या कुटुंबीयांना भेटून सांत्वन करण्यासाठी मंत्री त्या गावात गेले होते त्यावेळी ही भयंकर घटना घडली.

Attack On Minister: कॅबिनेट मंत्र्यावर जीवघेणा हल्ला, ताफ्यावर दगडफेक अन्...; राजकारणात खळबळ
Guardian Minister: नंदुरबार जिल्ह्याला मिळाला नवा पालकमंत्री,कोणत्या पक्षाच्या नेत्याची लागली वर्णी?

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, मंत्री गावात पोहोचल्यानंतर थोड्याच वेळात सुमारे ३०० ते ४०० स्त्री-पुरुषांचा जमाव जमला. जमावातील अनेकांच्या हातात काठ्या आणि इतर शस्त्रे देखील होती. त्यांनी अचानक मंत्र्यांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. काही नागरिकांनी मंत्र्यांना पकडून त्यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. तर इतरांनी त्यांच्यावर काठ्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

Attack On Minister: कॅबिनेट मंत्र्यावर जीवघेणा हल्ला, ताफ्यावर दगडफेक अन्...; राजकारणात खळबळ
FIR against minister: गृहमंत्र्यांवर FIR दाखल करा, कोर्टाचे आदेश; कबड्डी सामन्यात लावली होती ५०० रुपयांची पैज

या घटनेत मंत्री थोडक्यात बचावले. पण या घटनेत मंत्र्यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले. मंत्र्यांसोबत असलेले सुरक्षा कर्मचारी आणि समर्थक त्यांच्या मदतीसाठी धावून आल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आणि मंत्र्यांचा बचाव करण्यात यश आले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मंत्र्यांना घटनास्थळावरून सुरक्षितपणे बाहेर काढून एका सुरक्षित ठिकाणी नेले. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या बिहार पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Attack On Minister: कॅबिनेट मंत्र्यावर जीवघेणा हल्ला, ताफ्यावर दगडफेक अन्...; राजकारणात खळबळ
Raigad Guardian Minister: भरत गोगावले की तटकरे? तिढा सुटला पण, रायगडचं पालकमंत्रिपद गेलं कोणाकडं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com