Manasvi Choudhary
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अकाली निधन झाल्याने महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्रीपदाचा कारभार कोण पाहणार अश्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद ही जबाबदारी मोठी असल्याने अजित पवार गेल्यानंतर हे पद कोण सांभाळणार? असा प्रश्न आहे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्रीपद हे कायमच चर्चेत असते. तुम्हाला माहितीये का महाराष्ट्राचे सर्वात पहिले उपमुख्यमंत्री कोण होते.
माहितीनुसार, महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे हे होते. माहितीनुसार, ७ मार्च १९७८ रोजी नाशिकराव तिरपुडे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
यावेळी वसंतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री पदाची तर नाशिकराव तिरपुडे यांनी पहिल्यांदाच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
महाराष्ट्रात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यासोबत उपमुख्यमंत्री विराजमान झाले.मार्च १९७८ ते जुलै १९७८ असा त्यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ होता.