Varanasi : मांस विक्री व्यवसायावर मोठा बदल; टप्प्याटप्प्याने दुकाने शहराबाहेर हलवणार, कुठे आणि का?

Kashi Meat Shop Relocation : काशीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीचं जतन करण्यासाठी वाराणसी महानगरपालिकेने शहरातले मांस, मटण आणि मासळीची दुकाने शहराबाहेर हलवण्याच्या प्रस्त्वाला मंजुरी दिली आहे.
Kashi meat shop relocation
Varanasi meat market shiftgoogle
Published On

बाबा विश्वनाथांचे शहर काशी आपल्या कालातीत परंपरांसाठी देशात आणि जगात नेहमीच प्रसिद्ध आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख लक्षात घेऊन वाराणसी महानगरपालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता शहराच्या हद्दीत मांस, मटण आणि माशांची दुकाने चालणार नाहीत. त्यांना शहराबाहेर पाठवलं जाईल.

शनिवारी मैदगिन जवळील टाऊन हॉलमध्ये महापौर अशोक कुमार तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महापौरांनी सांगितलं की, काशीला दरवर्षी देश-विदेशातून लाखो पर्यटक आणि भाविक भेट देत असतात. शहराची धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख कायम ठेवण्यासाठी आणि तिथे स्वच्छता ठेवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Kashi meat shop relocation
Monsoon Tourism: पुण्याजवळच्या १० स्वर्गाहून सुंदर ठिकाणांना भेट द्याच, धुक्याची चादर अन् हिरवाईत वीकेंड होईल एकदम मस्त

महापालिका आयुक्त हिमांशू नागपाल यांनी सभागृहाला माहिती देताना सांगितलं की, या योजनेची सुरुवात पुढील सहा महिन्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात शहराबाहेरचे पाच ठिकाणांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये रामनगर, सुजाबाद, गणेशपूर, आवलेशपूर आणि शिवपूर या भागांचा समावेश होतो.

महानगरपालिकेच्या म्हणण्यानुसार, निवडलेली ठिकाणं अशी आहेत की, नागरिकांना तिथे खरेदीसाठी गैरसोय होणार नाही. शहराबाहेरील या बाजारपेठांमुळे वाहतूक कोंडी कमी होईल. तसेच शहरातली स्वच्छता व्यवस्थाही राबवता येईल.

शहराबाहेरच्या बाजारांमुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि शहरातली स्वच्छता व्यवस्थासुद्धा जास्त प्रभावीपणे राबवता येईल. या बैठकीत वर्षभराआधीही अशा प्रकारचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. पण त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. तसेच श्रावण महिन्यात शहरातली दुकानं बंद राहिल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेल्या व्यापाऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याच्याही बैठकीत बोलण्यात आलं.

Kashi meat shop relocation
Jeans Pocket Facts : जीन्सला छोटा खिसा का असतो? ९९ टक्के लोकांना उत्तर माहीत नसेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com