Monsoon Tourism: पुण्याजवळच्या १० स्वर्गाहून सुंदर ठिकाणांना भेट द्याच, धुक्याची चादर अन् हिरवाईत वीकेंड होईल एकदम मस्त

Sakshi Sunil Jadhav

सिंहगड किल्ला

तुम्ही पावसाळ्यात सिंहगडाच्या डोंगरावर पसलेलं धुकं आणि हिरवाई पाहू शकता. सोबत गरमागरम भंजी आणि चहाचा आस्वाद घेत निसर्गाचा आनंद लुटू शकता.

places to visit near Pune

खडकवासला धरण

शहरापासून जवळ असलेलं खडकवासला धरण पावसाळ्यात खूपच सुंदर दिसतं. मित्रांसोबत भुट्टा खात तुम्ही या ठिकाणी धमाल करू शकता.

weekend getaway near Pune,

पानशेत धरण

पानशेत धरण हे गर्दीपासून लांब शांत आणि सुंदर ठिकाण आहे. पावसाळ्यात इथला थंडावा मनाला प्रसन्न करतो.

weekend getaway near Pune,

ताम्हिणी घाट

वळणदार रस्ते आणि दाट हिरवाईमुळे ताम्हिणी घाट पावसाळ्यात स्वर्गासारखा दिसतो. फोटोग्राफी आणि लॉंग ड्राइव्हला तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता.

Pune rainy season travel

मुळशी डॅम

हिरवेगार डोंगर, पावसाच्या सरींमध्ये मुळशी डॅमवर एक वेगळाच अनुभव येतो. विकेंडला तुम्ही फॅमिलीसोबत या ठिकाणाला नक्कीच भेट द्या.

Pune Tourism

राजमाची किल्ला

तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल तर तुम्ही मित्र-मैत्रिणींसोबत राजमाची किल्ल्याला भेट देऊ शकता. पावसाळ्यात तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता.

Pune Tourism

लोहगड किल्ला

हिरवागार ट्रेक आणि ढगांमध्ये हरवलेलं दृश्य पाहायचं असेल तर लोहगड हा बेस्ट ऑप्शन आहे.

Pune Tourism

लवासा

पावसाळ्यात लवासा खूप सुंदर आणि खुलून दिसतो. ढगांच्या सानिध्यात फिरताना एखाद्या युरोपियन शहरात आल्याचा फील होतो.

Pune Tourism

पावना लेक

पावना लेकच्या काठावर बसून पावसाचा आनंद घेण्याची मजा काही वेगळीच असते. कॅम्पिंग आणि शांत वातावरणासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.

Pune Tourism

कास पठार

पावसाळ्याच्या शेवटी आणि फुलांच्या हंगामात कास पठार रंगीबेरंगी फुलांनी बहरला जातो. निसर्गप्रेमींसाठी हा अनुभव लक्षात राहणारा आहे.

Pune Tourism

NEXT: एकदाच रिचार्ज करा आणि 336 दिवस निर्धास्त! Jio चा भन्नाट प्लॅन

Jio 336 days validity
येथे क्लिक करा