Sakshi Sunil Jadhav
तुम्हालाही jio चा वर्षभराचा रिचार्ज हवा असेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. जिओ युजर्ससाठी रिलायन्स जिओ कंपनी स्वस्तात मस्त रिचार्ज प्लान्स देत असते.
जिओचा रिचार्जची वैधता ही १ वर्षांची असणार आहे. त्यामुळे तुम्हाला वर्षभर रिचार्ज करावा लागणार नाही.
जिओ पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार, १७४८ रुपयांचा एक रिचार्ज प्लॅन आहे, जो सर्वात स्वस्त वर्षभराचा रिचार्ज आहे.
जिओच्या ₹१,७४८ च्या प्लॅनमध्ये ग्राहकांना कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळते. याव्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये एकूण ३,६०० एसएमएस मिळतात.
यामुळे वापरकर्ते वर्षभर कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय कॉल करू शकतात. संदेश पाठवू शकतात. मात्र, या प्लॅनमध्ये मोबाइल डेटाचा समावेश नाही.
या प्लॅनमध्ये केवळ कॉलिंग आणि एसएमएसच नाही, तर अतिरिक्त फायदेही मिळतात. जिओ ग्राहकांना 'जिओ टीव्ही' ची सुविधा देते, ज्यामुळे ते विविध टीव्ही चॅनेल्स आणि मनोरंजनाचे कार्यक्रम पाहू शकतात.
याव्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये 'जिओ एआय क्लाउड' हे वैशिष्ट्य समाविष्ट आहे, ज्याद्वारे वापरकर्ते त्यांचे महत्त्वाचे फोटो, व्हिडिओ आणि दस्तऐवज ऑनलाइन साठवू शकतात.
ही योजना ज्येष्ठ नागरिक, दुय्यम क्रमांक वापरणारे लोक आणि बेसिक फोन वापरणाऱ्या ग्राहकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते.
अनेक लोक केवळ बँकिंग व्यवहार, ओटीपी किंवा महत्त्वाच्या कॉल्ससाठी आपला दुय्यम क्रमांक सक्रिय ठेवतात.
अशा ग्राहकांना दरमहा रिचार्ज करण्याची गरज नसते. केवळ एका रिचार्जद्वारे ते आपला क्रमांक जवळपास वर्षभर सक्रिय ठेवू शकतात.