

भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू
झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
भाजप नेते चंद्रपाल सिंह यांची हत्या केल्याचा आरोप
उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली
उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये भाजपच्या बड्या नेत्याचे निधन झालं. भारतीय जनता पक्षाशी संबंधित एका शेतकरी नेत्याचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला. बिलारी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दांडा गोविंदपूर गावापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर झाडाला लटकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये एकच खळबळ उडाली. त्यांची हत्या झाली की त्यांनी आत्महत्या केली याचा तपास पोलिस करत आहेत.
भाजपचे नेते चंद्रपाल सिंह (५५ वर्षे) हे मंगळवारी रात्री घरासमोर व्हरांड्यात झोपले होते. त्याच रात्री उशिरा ते अचानक गायब झाले. सकाळी काही गावकरी शेतात गेले असता त्यांना त्यांचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनास्थळी भाजप नेत्याच्या कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. बिलारी पोलिसांनी आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही घटना आत्महत्या असल्याचे म्हटले जात आहे. पण मृत भाजप नेत्याच्या कुटुंबीयांनी ही हत्या असल्याचे म्हटले आहे. त्यांनी दावा केला आहे की, चंद्रपाल सिंग यांची हत्या करून नंतर आत्महत्या भासवण्यासाठी त्यांना झाडाला लटकवण्यात आले. त्यांचा धाकटा भाऊ, वीरपाल सिंग आणि मुलगा, राजेश कुमार यांनी दावा केला की, घटनास्थळाच्या आजूबाजूला विविध ठिकाणी एक मोबाइल, एक काठी आणि मृताचे कपडे विखुरलेल्या अवस्थेत आढळले. त्यांच्या मते या विखुरलेल्या वस्तूंवरून तिथे झटापट झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
चंद्रपाल सिंह यांच्या कुटुंबीयांनी आरोप आहे की, चंद्रपाल सिंग यांना रात्री एका ओळखीच्या व्यक्तीने रात्री उशिरा फोन करून बाहेर बोलावले. गावप्रमुख राजेंद्र सिंग यांनीही ही घटना संशयास्पद असल्याचे सांगितले आहे. या घटनेत काहीतरी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यांच्याशी शेवटचा संपर्क कोणी साधला होता हे निश्चित करण्यासाठी पोलिस आता भाजप नेत्याचा मोबाइल फोनच्या कॉल डिटेल रेकॉर्डची तपासणी करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.