भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन; आमदार-खासदारांचे नियोजित दौरे रद्द, राजकीय वर्तुळात शोककळा

BJP Leader Dies During Char Dham Yatra In Uttarakhand: भाजपचे माजी मंडळ अध्यक्ष मित नारायण वर्मा यांचे उत्तराखंडमधील चारधाम यात्रेदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अनेक नेत्यांनी आपले दौरे रद्द करत श्रद्धांजली अर्पण केली.
BJP leader Mit Narayan Verma passed away after suffering a heart attack during the Char Dham Yatra in Uttarakhand.
BJP leader Mit Narayan Verma passed away after suffering a heart attack during the Char Dham Yatra in Uttarakhand.saam tv
Published On

भाजप छोटकी खरगडीहा मंडळाचे माजी अध्यक्ष आणि पक्षाचे सक्रिय नेते मित नारायण वर्मा यांचे उत्तराखंडमधील चारधाम यात्रेदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात शोककळा पसरली असून पक्षातील अनेक नेत्यांनी त्यांचे दौरे रद्दे करत त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहे. वर्मा हे त्यांच्या पत्नी आणि इतर स्थानिक लोकांसोबत 28 मार्चला बसने चार धाम यात्रेला निघाले होते, प्रवासादरम्यान ते उत्तरखंडमधील हरिद्वार-ऋषिकेश येथे पोहोचले. गंगोत्रीजवळ ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

BJP leader Mit Narayan Verma passed away after suffering a heart attack during the Char Dham Yatra in Uttarakhand.
Shocking : मटण अर्धवट शिजलं, मित्रांसमोरच नवऱ्यानं वाद घातला; अपमान सहन न झाल्यानं बायकोनं संपवली जीवनयात्रा

नेत्यांनी रद्द केले दौरे

वर्मा यांच्या आकस्मिक निधनाची बातमी समजताच भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या सन्मानार्थ अनेक नेत्यांनी आपले नियोजित दौरे रद्द करून आरतोका येथील त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. यामध्ये खासदार शिवपूजन राम, माजी सभापती उपेंद्र कुमार, बेगाबांद भाजप मंडळ अध्यक्ष सौरभ मिश्रा, सुभाष राणा, नारायण हझम यांच्यासह पुरण पंडित, मनोहर वर्मा, बाबुचंद साओ, पंकज राम, कैलाश वर्मा, हिरालाल वर्मा, संतोष वर्मा आणि तुपलाल वर्मा या मान्यवरांचा समावेश आहे

BJP leader Mit Narayan Verma passed away after suffering a heart attack during the Char Dham Yatra in Uttarakhand.
जम्मू-श्रीनगर आता फक्त काही तासांत! वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ, कसा असणार मार्ग आणि वैशिष्ट काय?

कुटुंबीय उत्तराखंडला रवाना

या घटनेची माहिती मिळताच वर्मा यांचे कुटुंबीय तातडीने उत्तराखंडकडे रवाना झाले आहेत. मित नारायण वर्मा हे त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे आणि पक्षकार्यामुळे भागात अत्यंत लोकप्रिय होते. त्यांच्या निधनाने आरतोका गावावर शोककळा पसरली असून, विविध स्तरातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com