India-Pakistan Tensions saam Tv
देश विदेश

India-Pakistan Tensions: भारताकडून पाकिस्तानला जशास तसं उत्तर, दिल्लीतील उच्चायुक्तालयाबाहेर फिरवला बुलडोझर; सुरक्षा घेतली काढून

Delhi Action Against Pakistan High Commission: दिल्लीमध्ये पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाबाहेर मोठी कारवाई करण्यात आली. उच्चायुक्तालयाबाहेरील अतिक्रमण हटवण्यात आले.

Priya More
  • दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेर भारताकडून मोठी कारवाई

  • पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेरील बॅरिकेड्स आणि बांधकाम हटवण्यात आले

  • इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयावरील कारवाईला भारताचे प्रत्युत्तर

  • चाणक्यपुरीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेर अतिक्रमण हटवले

भारताने पाकिस्तानने केलेल्या कृत्याचं जशाच तसं उत्तर दिलं आहे. भारताने दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेरील बाह्य सुरक्षा व्यवस्था हटवली. त्याचसोबत पाकिस्तानच्या दिल्लीतील उच्चायुक्तालयाबाहेरील वाहतुकीचे खांब आमि बॅरिकेड्स बुलडोझरने पाडण्यात आले. इस्लामाबादमध्ये पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर कारवाई केली होती. भारतीय उच्चायुक्तालयाबाहेरील पार्किंगचे खांब पाकिस्तानने हटलवले होते. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांनंतर ही कारवाई करण्यात आली. भारताने केलेली ही कारवाई म्हणजे पाकिस्तानला दिलेले चोख प्रत्युत्तर आहे.

दिल्लीतील चाणक्यपुरी येथील पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेर भारतीय प्रशासनाने कारवाई केली आहे. पाकिस्तानी उच्चायुक्ताबाहेर पदपथावरील अवैध अतिक्रमणे आणि एक कथित बांधकाम हटवण्यासाठी बुलडोझर फिरवण्यात आला. पाकिस्तान दूतावासाच्या व्हिसा विभागाजवळ असलेले हे बांधकाम, उच्चायुक्तालयाच्या निर्धारित परिसराबाहेर असल्याचे आढळून आले. इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेरील सुरक्षा पाकिस्तानने कमी करून आणि पार्किंगच्या रचनेत बदल केल्याच्या बातमीनंतर भारताकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

या अतिक्रमण कारवाईनंतर अधिकाऱ्यांनी सांगिततले की, ही बांधकामे उच्चायुक्तालयाच्या निर्धारित हद्दीबाहेर बांधण्यात आली होती. पाकिस्तान उच्चायुक्तालयाचे कार्यालय दिल्लीतील चाणक्यपुरी येथील शांतीपथवर आहे. पाकिस्तानने आधी कारवाई केली त्यानंतर भारताने कारवाई केली.

पाकिस्तानने भारताच्या व्हिसा विभागाजवळील बॅरिकेड्स, कुंपण आणि रांगा लावण्यासाठी करण्यात आलेली व्यवस्थापनाच्या रचना देखील हटवण्यात आल्या. जेसीबीच्या सहाय्याने उच्चायुक्तालयाबाहेर ही कारवाई करण्यात आली. याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये तुटलेले कठडे, दरवाजे, लोखंडी चौकटी, छताचे पत्रे, विटा आणि काँक्रीटचे तुकडे विखुरलेले दिसत आहेत.

पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांमधील संबंध आधीच तणावपूर्ण आहेत. मागच्या वर्षी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तणाव लक्षणीयरित्या वाढला. या हल्ल्यामध्ये २६ जण ठार झाले होते. भारताने याला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर सुरू केले. ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या ताब्यातील प्रदेशातील दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करण्यात आले. १० मे रोजी झालेल्या शस्त्रसंधीनंतर दोन्ही देशांमधील लष्करी तणाव निवळला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

How To Protect Skin In AC: दिवसभर ACमध्ये बसता? त्वचा ड्राय पडू नये म्हणून करा 'या' ७ गोष्टी

Chilli Pickle : पोळी-भाकरीसोबत लागेल भन्नाट! अशा पद्धतीने बनवा हिरव्या मिरचीचे लोणचे

Maharashtra News Live Update: विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला प्रकरण, संतोष चव्हाणचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

IAS Officer Transfer: मोठी बातमी! १६ आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे झाली नियुक्ती?

Heavy Rain Alert : देशातील २२ राज्यांवर अस्मानी संकट, हवामान खात्याचा अलर्ट काय? VIDEO

SCROLL FOR NEXT