'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

Telangana CM Revanth Reddy Ram Shiva controversy: श्रीराम हा श्रीमंतांचा देव आहे आणि महादेव हा गरिबांचा.हे आम्ही नव्हे एका मुख्यमंत्र्यांचं म्हणणंय. आणि त्यामुळेच श्रीमंत पक्ष असलेल्या भाजपचा श्रीराम असल्याचं विधानही या मुख्यमंत्र्यानं केलंय. कोण आहेत हे मुख्यमंत्री? कशावरून त्यांनी देवांची वाटणी केलीय? पाहूयात हा रिपोर्ट.
Telangana CM Revanth Reddy Ram Shiva controversy
Telangana CM Revanth Reddy Ram Shiva controversysaam tv
Published On: 
Summary
  • रेवंत रेड्डींच्या राम आणि महादेवावरील वक्तव्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे.

  • भगवान महादेव गरिबांचा आणि भगवान रामांना श्रीमंतांचा देव असे संबोधले.

  • रेवंत रेड्डींनी ‘जय श्रीराम’ आणि ‘हर हर महादेव’ या घोषणांचा उल्लेख करत भाजपवर टीका

अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरीवरुन विरोधकांच्या निशाणावर भाजप असतानाच तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचं वादग्रस्त विधान समोर आलंय. राम श्रीमंतांचे देव आहेत, महादेव गरिबांचा देव आहेत, म्हणून भाजप 'हर हर महादेव'चा जयघोष करत नाही, असं रेवंत रेड्डींनी एका मुलाखतीत म्हटल्याने वाद निर्माण झालाय.

मुख्य म्हणजे ही टिप्पणी करताना रेड्डी यांनी दक्षिण भारतातील लोक द्रविड आहेत आणि उत्तर भारतातील लोक आर्य आहेत, याकडे लक्ष वेधलंय. मात्र या वक्तव्यावरुन भाजपचे ज्येष्ठ नेते शहानवाझ हुसेन यांनी काँग्रेसचा समाचार घेत लोकांमध्ये संभ्रम करण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलंय.

Telangana CM Revanth Reddy Ram Shiva controversy
१८ वर्षांखालील मुलांवर सोशल मीडिया बंदी; सुप्रीम कोर्टाच्या केंद्र सरकारला सूचना

उत्तर भारतातील भाजपच्या निवडणुकीतील यशाचा संदर्भ देत,रेवंत रेड्डी यांनी भाजपने प्रभू राम यांना चोरले आहे, असा तिखट हल्लाबोल केल्याने भाजप नेते अस्वस्थ झाले आहेत. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते संजय कुमार बांदी यांनी मुख्यमंत्री रेड्डी हे श्रीराम आणि महादेव यांच्यात राजकीय फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केलाय.

Telangana CM Revanth Reddy Ram Shiva controversy
Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

एकीकडे देशभरातील विरोधक SIR वरुन निवडणूक आयोग आणि मोदी सरकारवर तुटून पडलेले आहेत. त्यात आता रेवंत रेड्डींच्या विधानानं वाद पेटलाय. यापूर्वी थोर पुरुषांना जातीचे लेबल लाऊन राजकारण केल्याचं आपण पाहिलं आहे. आता देवांचीही गरीब-श्रीमंत अशी वाटणी केल्यानं नव्या मुद्द्यावर राजकारण पेटण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com