Made in Pakistan Cosmetics: पाकच्या सौंदर्यप्रसाधनांचा राज्यात सुळसुळाट; ‘गोरी ब्युटी क्रीम’चं संगमनेर कनेक्शन

Made in Pakistan Cosmetics Sangamner Connection: देशात आत्मनिर्भरतेसाठी प्रयत्न सुरू असतानाच आता महाराष्ट्रात 'मेड इन पाकिस्तान' मालाची विक्री झाल्याची माहिती समोर आलीये. भारतात पाकिस्तानी मालावर कडक निर्बंध असताना हा माल नेमका कुणी आणला? आणि तो कुठे पकडण्यात आला? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
MADE IN PAKISTAN COSMETICS FOUND IN MAHARASHTRA; GORI BEAUTY CREAM SANGAMNER LINK UNDER SCANNER
MADE IN PAKISTAN COSMETICS FOUND IN MAHARASHTRA; GORI BEAUTY CREAM SANGAMNER LINK UNDER SCANNER
Published On
Summary
  • महाराष्ट्रात ‘मेड इन पाकिस्तान’ सौंदर्यप्रसाधनांच्या विक्री

  • ‘गोरी ब्युटी क्रीम’चे संगमनेर कनेक्शन तपासाच्या केंद्रस्थानी

  • पाकिस्तानी मालावरील निर्बंध असतानाही उत्पादने राज्यात कशी आली

पाकिस्तानमधील व्यापारावर निर्बंध असताना राज्यात शत्रुराष्ट्राच्या सौंदर्यप्रसाधनांची सर्रास विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये अन्न व औषध प्रशासनानं गोल्डन मार्केटमधील दुकानावर छापा टाकलाय. यावेळी पाकिस्तान निर्मित 14 हजार रुपयांची ‘गोरी ब्युटी क्रीम’ आणि ‘गोरी डे अँड नाईट क्रीम’ जप्त करण्यात आलीये. पोलिसांनी दुकानदार शाहीद रियाज शेखला ताब्यात घेतलंय. परवानगी नसताना विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

दरम्यान राज्यात यापूर्वी पाकिस्तानची सौंदर्यप्रसाधने आणि वस्तू यांची कुठे विक्री होताना आढळलं होतं ते पाहूया. दरम्यान राज्यात यापूर्वी पाकिस्तानची सौंदर्यप्रसाधने आणि वस्तू यांची कुठे विक्री होताना आढळलं होतं ते पाहूया.

छत्रपती संभाजीनगर - मार्च 2026

धुळे- एप्रिल 2026

पिंपरी-चिंचवड - जून 2026

नांदेड - जुलै 2026

हा गंभीर प्रकारावर हिंदुत्ववादी संघटनांनी संताप व्यक्त करुन सखोल चौकशीची मागणी केलीये.

MADE IN PAKISTAN COSMETICS FOUND IN MAHARASHTRA; GORI BEAUTY CREAM SANGAMNER LINK UNDER SCANNER
Plane Accident : पर्यटकांचे विमान शेतात कोसळले, १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू; नाझका लाईन्सजवळ भीषण अपघात

खरंतर, पिंपरी-चिंचवडमधील श्री मोरया गोसावी मंदिर यात्रेत चक्क 'मेड इन पाकिस्तान' चादरीची विक्री होत असल्याचा धक्कादायक खुलासा एका जागृत महिलेने केला होता. भारतात पाकिस्तानी वस्तूंवर कडक निर्बंध असताना ही सौंदर्य प्रसाधन स्थानिक बाजारात आली कशी? हाच महत्वाचा सवाल आहे. आज जर चोरट्या मार्गानं भारतात पाकिस्तानची 'सौंदर्य प्रसाधनं' येऊ शकतात, तर उद्या भारतातील अंतर्गत सुरक्षेलाही धोका पोहोचू शकतो, अशी भीती निर्माण झालीये.

MADE IN PAKISTAN COSMETICS FOUND IN MAHARASHTRA; GORI BEAUTY CREAM SANGAMNER LINK UNDER SCANNER
Pakistan Blast: शांतता रॅलीदरम्यान मोठा स्फोट; ७ जण ठार, १८ जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com