Pakistan Blast: शांतता रॅलीदरम्यान मोठा स्फोट; ७ जण ठार, १८ जखमी

Blast During Peace Rally in Pakistan : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील स्वात जिल्ह्यात एका शांतता रॅलीदरम्यान झालेल्या स्फोटात किमान सात जण ठार झाले आहेत. या घटनेत अन्य सुमारे १८ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
Seven Dead, 18 Hurt After Blast During Peace Rally in Pakistan
Seven Dead, 18 Hurt After Blast During Peace Rally in PakistanAI Saam tv
Published On
Summary
  • पाकिस्तानच्या स्वात जिल्ह्यात शांतता रॅलीदरम्यान भीषण स्फोट झाला.

  • या स्फोटात किमान ७ जणांचा मृत्यू तर १८ जण जखमी झाले.

  • घटना खैबर पख्तुनख्वा प्रांतातील काबल शहरात घडली.

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील स्वात जिल्ह्यातील निघालेल्या एका शांती रॅली मोर्चा दरम्यान मोठा स्फोट घडला. यात जवळपास ७ जणांचा मृत्यू झालाय तर १८ जण जखमी झालेत. खैबर पख्तुनख्वामधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट स्वात जिल्ह्यातील काबल शहरात झाला. येथील शांतता रॅलीदरम्यान हा स्फोट झाला. या घटनेप्रकरणी स्वात पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार किमान सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर १८ जण गंभीर जखमी झालेत.

Seven Dead, 18 Hurt After Blast During Peace Rally in Pakistan
मोठी दुर्घटना ! २५० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बोटीला भीषण आग; ५ जणांचा मृत्यू ४१ जण बेपत्ता

सूत्रांच्या माहितीनुसार, स्वात येथील रॅलीमध्ये झालेला स्फोट हा आत्मघातकी हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र, याला अद्याप कोणतीही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. स्वातमध्ये शांतता रॅलीचे आयोजन 'स्वात अमन जिरगा' या स्थानिक आदिवासी परिषदेने केले होते. याचा उद्देश या भागात शांतता प्रस्थापित करण्याची मागणी करणे हा होता. आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाहीये.

Seven Dead, 18 Hurt After Blast During Peace Rally in Pakistan
Plane Accident : पर्यटकांचे विमान शेतात कोसळले, १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू; नाझका लाईन्सजवळ भीषण अपघात

एका आठवड्यापुर्वी झाला होता स्फोट

दरम्यान गेल्या काही महिन्यांत स्वात भागातील सुरक्षा व्यवस्था बिघडली आहे.अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचाव पथकांनी स्फोटात जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयांत दाखल केले, तर पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी तो परिसर घेराव घालून बंद करण्यात आलाय. याआधी २६ जुलै रोजी खैबर पख्तुनख्वामध्ये असाच एक शक्तिशाली स्फोट झाला होता, ज्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बाजोर जिल्ह्यात घडली होती. सलारझाई तहसीलमध्ये 'ताली धरण' जवळ झालेल्या एका स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, मृतांची ओळख गुलाम आणि सुलेमान कारी अशी पटली असून, ते दोघेही बाजौरचे रहिवासी होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com