Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Teacher’s Inspiring Story: आता एका शिक्षकाची प्रेरणादायी आणि शिक्षण व्यवस्थेच्या डोळ्यात अंजन घालणारी बातमी. एक शिक्षक केवळ एका विद्यार्थिनीला शिकवण्यासाठी जंगलातून तब्बल पाच किलोमीटरची पायपीट करतो. कोण आणि कुठला आहे हा शिक्षक? आपल्या उराशी मोठं स्वप्न बाळगणारी ही एकच विद्यार्थिनी कशी घेत आहे शिक्षणाचे धडे. पाहूयात हा रिपोर्ट.
55-year-old Mithari Guruji Walks 5 Km Through Forest For One Student
55-year-old Mithari Guruji Walks 5 Km Through Forest For One Studentsaam tv
Published On: 
Summary
  • ५५ वर्षीय मिठारी गुरुजींच्या समर्पणाची प्रेरणादायी कहाणी समोर आली आहे.

  • एका विद्यार्थिनीला शिकवण्यासाठी ते जंगलातून तब्बल ५ किमी पायपीट करतात.

  • दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासमोरील अडचणी या कहाणीतून अधोरेखित होतात.

कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा हा तसा डोंगराळ आणि घनदाट जंगलांचा परिसर मात्र, याच गगनबावड्यातील मिशन एज्युकेशनची अनोखी कहाणी समोर आलीये. 55 वर्षीय जीवन मिठारी कळे या गावातून दररोज 50 किलोमीटरचा प्रवास करून धुंदवडे गावातील कावळटेक येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक विद्या मंदिर शाळेवर जाातात.

मात्र त्यांच्या या प्रवासात तब्बल अडीच किलोमीटरची घनदाट जंगलातून पायवाट आहे. या वाटेवरून ते दररोज पाच किलोमीटरची पायपीट करत असतात. हे सारं ते करतात केवळ एका विद्यार्थिनीसाठी. विशेष म्हणजे स्वरा बोडके नावाची ही विद्यार्थिनीही मोठ्या चिकाटीनं दररोज या शाळेत येऊन मिठारी गुरूजींकडून शिक्षणाचे धडे घेते. मात्र या शाळेतून विद्यार्थ्यांची गळती का झाली ते पाहूयात.

एका विद्यार्थिनीसाठी शिक्षकाची पायपीट

धुंदवडे गावातील कावळटेक या अत्यंत दुर्गम वस्तीत 1974 साली जिल्हा परिषदेची प्राथमिक विद्यामंदिर शाळा सुरू झाली. एकेकाळी या शाळेत तब्बल 50 ते 70 विद्यार्थी शिकत होते. मात्र, पायाभूत सुविधा नसल्यानं अनेक कुटुंबांनी शहरांकडे स्थलांतर केलं. कावळटेक वस्तीमध्ये सध्या केवळ दोन ते तीन कुटुंबं राहतात. पक्का रस्ता, वीज आणि इतर मूलभूत सुविधांच्या अभावामुळे अनेक कुटुंबांनी वस्ती सोडून शहराची वाट धरली.

55-year-old Mithari Guruji Walks 5 Km Through Forest For One Student
दुष्काळाच्या पाहणी दौऱ्याला दांडी; जिल्हाधिकाऱ्यांनी केज तहसीलदारांचा पदभार तडकाफडकी काढला

26 जुलै 2013 पासून जीवन मिठारी या शाळेत कार्यरत आहेत. त्यांनी दुर्गम शाळेत सेवा करण्याचं आव्हान स्वीकारलं. मे 2029 मध्ये निवृत्तीपर्यंत शिक्षण सेवा सुरू ठेवण्याचा त्यांचा निर्धार आहे. विद्यार्थी एक असो किंवा शंभर शिक्षणाचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र एका गुरुची निष्ठा आणि मुलीच्या स्वप्नांची ही गाथा कामचुकार शिक्षकांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे.

55-year-old Mithari Guruji Walks 5 Km Through Forest For One Student
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! परीक्षा शुल्क माफ; फडणवीस सरकारचा निर्णय

वन्यप्राण्यांच्या सावटाखाली जीव मुठीत धरून दररोज 5 किलोमीटर पायपीट करणाऱ्या या आदर्श शिक्षकाच्या आणि विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी शासनानं आता तरी या दुर्गम भागात तातडीनं दळणवळण, रस्ते तसंच अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com