

दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केज तहसीलदार भारत गंगावणे यांच्यावरील कारवाई चर्चेत
भारत गंगावणे यांच्याकडील तहसीलदार पदाचा अतिरिक्त कार्यभार नायब तहसीलदार अशोक भंडारे यांच्याकडे
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पीक नुकसान, पाणीटंचाई, पीकविमा, चारा आणि रोजगार या मुद्द्यांवर प्रशासनाकडून आढावा
योगेश काशिद, साम प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात भीषण दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली असताना, प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर काम करणे अपेक्षित आहे. मात्र, प्रशासनाची पूर्वपरवानगी न घेता मुख्यालय सोडणे आणि थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या पाहणी दौऱ्यासह आढावा बैठकीला दांडी मारणे केजचे तहसीलदार भारत गंगावणे यांना चांगलेच महाग पडले आहे.
या निष्काळजीपणाची गंभीर दखल घेत बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी धडक ॲक्शन घेत तहसीलदार भारत गंगावणे यांच्याकडील पदभार तडकाफडकी काढून घेतला आहे. हा अतिरिक्त कार्यभार आता नायब तहसीलदार अशोक भंडारे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे, असं लेखी पत्र जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन काढून दणका दिला आहे.
मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ असून मुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी व विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आहेत. जनता दुष्काळाच्या झळा सोसतेय दुसरीकडे केजचे तहसीलदार सुट्टीवर गेलेत. तहसीलदाराने जिल्हाधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या पाहणी दौऱ्यासह आढावा बैठकीला दांडी मारली. या निष्काळजीपणाची गंभीर दखल घेत बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी धडक ॲक्शन घेत तहसीलदार भारत गंगावणे यांच्याकडील पदभार तडकाफडकी काढून घेतलाय.
बीड जिल्ह्यात भीषण दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली असताना, प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर काम करणे अपेक्षित आहे. मात्र, प्रशासनाची पूर्वपरवानगी न घेता मुख्यालय सोडणे आणि थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या पाहणी दौऱ्यासह आढावा बैठकीला दांडी मारणे केजचे तहसीलदार भारत गंगावणे यांना चांगलेच महाग पडले आहे. हा अतिरिक्त कार्यभार आता नायब तहसीलदार अशोक भंडारे यांच्याकडे सोपवण्यात आलाय.असे लेखी पत्र जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन काढून दणका दिलाय.
केज तालुक्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी स्वतः शनिवारी केज तहसील कार्यालयास भेट दिली होती. याच वेळी आमदार नमिता मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थितीत दुष्काळ निवारणाचा महत्त्वाचा आढावा आयोजित करण्यात आला होता.
दुष्काळाच्या काळात तालुकास्तरावर तहसीलदार हेच संपूर्ण उपाययोजनांचे मुख्य समन्वयक आणि जबाबदार प्रमुख अधिकारी असतात. परंतु, अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या बैठकीस गैरहजर न राहण्याचे व पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय न सोडण्याचे कडक आदेश असतानाही तहसीलदार गंगावणे या बैठकीला गैरहजर राहिले. त्यांच्या या दांडीमुळे दुष्काळी कामांच्या आढाव्यात थेट प्रशासकीय अडथळा निर्माण झाला. प्रशासकीय कामकाजात कोणतीही दिरंगाई किंवा अडथळा येऊ नये आणि दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना गतीने राबवल्या जाव्यात, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापना शाखेने तातडीने आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार, भारत गंगावणे यांच्याकडील केज तहसीलदार पदाचा अतिरिक्त पदभार नायब तहसीलदार (महसूल-२) अशोक भंडारे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि धडक कारवाईमुळे बीड जिल्ह्यातील दांडीबाज अन् निष्काळजी अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले असून महसूल वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.