तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

Tukaram Mundhe : महाराष्ट्र FDA मधील अधिकाऱ्यांवरील कथित नियमभंगाच्या प्रकरणात कारवाईची शक्यता व्यक्त केली जातेय. दरम्यान संजय राऊतांनी काही FDA अधिकाऱ्यांवर वसुलीचे आरोप केले असून तुकाराम मुंढेंनी आरोपांसाठी ठोस पुरावे देण्याचे आवाहन केले आहे.
Tukaram Mundhe :
Maharashtra FDA officials facing action over alleged rule violationssaam tv
Published On: 
Summary
  • महाराष्ट्रात अन्न सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाविरोधात कारवाई सुरू आहे

  • संजय राऊतांनी काही FDA अधिकाऱ्यांवर कथित वसुलीचे आरोप केले आहेत.

  • तुकाराम मुंढेंनी आरोपांसाठी ठोस पुरावे आणि विशिष्ट माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FDA मधील 15 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता असल्याची माहिती हाती आलीय. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दोन महिन्यांपूर्वीच संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. कामचुकारपणा आणि नियमभंगाच्या आरोपांशी संबंधित या प्रकरणात प्रस्तावाची अंमलबजावणी झाल्यास FDA मधील 15 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई होऊ शकते.

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी खंडणी आणि वसुली करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत एफडीएवर गंभीर आरोप केलेत.राऊतांच्या आरोपानंतर आयुक्त तुकाराम मुंढें अॅक्शन मोडवर आले असून त्यांनी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलंय.

Tukaram Mundhe :
आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

एफडीएकडून करण्यात आल्या कारवायांविषयी माहिती देताना मुंढेंनी पत्रकार परिषदेत संजय राऊतांच्या आरोपांना उत्तर दिलंय.राज्यात अन्नभेसळ, अस्वच्छ हॉटेल किचन आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनकडून धडक कारवाई केली जातेय. आयुक्त तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखालील एफडीएचं पथकाकडून राज्यभरात कारवाई सुरूय.

Tukaram Mundhe :
Cabinet Meeting: अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत 10 टक्के आरक्षण; राज्य सरकारनं घेतले १० महत्त्वाचे निर्णय

अनेक अस्थापनांची परवाने एफडीएकडून निलंबित केली जात आहेत. मात्र त्याचदरम्यान या अधिकाऱ्यांवर खंडणी वसुलीचे आरोप केले जात आहेत.त्यावरून तुकाराम मुंढे आणि संजय आरऊत आमने-सामने आलेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या धडक मोहिमेचे एकीकडे कौतुक होत असताना एफडीएचे अधिकारी कारवाईच्या आड काही अधिकारी व्यावसायिकांकडून कथित वसुली करत असल्याचे गंभीर आरोप पुढे आले आहेत.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे खासदार संजय राऊत यांनी मुंढेंना याप्रकरणी तीन पानी पत्र लिहिलंय. काही FDAचे अधिकारी हॉटेल,रेस्टॉरंट आणि क्विक-कॉमर्स व्यावसायिकांना परवाना निलंबनाची भीती दाखवून पैसे मागत असल्याचा दावा केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com