Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

Shiv Sena Leader Died In Firing : ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते प्रदीप पूर्णेकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडलीय. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या पूर्णेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय.
Shiv Sena Leader Died In Firing :
Thane Firing: Shiv Sena Ubt Worker Pradeep Purnekar Dies During Treatmentsaamtv
Published On: 
Summary
  • ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाशी संबंधित प्रदीप पूर्णेकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना.

  • पूर्णेकर यांच्यावर दोन राऊंड फायर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती.

  • गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या पूर्णेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू

विकास काटे, साम प्रतिनिधी

ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाचा एका नेत्यावर मास्कधारी हल्लेखोराने गोळीबार केल्याची घटना घडलीय.ठाण्यातील मनोरमा नगरात ही गोळीबाराची घटना घडली असून कापूरबावडी पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या गोळीबारात ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांचा मृत्यू झालाय.

ठाकरे गट शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हे या गोळीबारात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर आर मॉलजवळील हाँस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. गोळीबार करणारे मास्क घालून आले होते. तीन ते चार अज्ञातांकडून प्रदीप पूर्णेकर यांच्यावर हा हल्ला करण्यात आला होता. दरम्यान पुर्णेकर यांची हत्या करण्यात आली, याचे कारण अद्याप कळू शकले नाहीये. या घटनेचा तपास पोलिसांकडून चालू आहे.

Shiv Sena Leader Died In Firing :
ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

मास्क घालून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी पूर्णेकर यांच्यावर दोन राऊंड फायर केले. गोळीबारात पूर्णेकर जखमी झाल्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान प्रदीप पूर्णेकर यांचा मृत्यू झाला. पूर्णेकर यांना कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आर मॉलजवळील इन्फिनिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. प्रदीप पूर्णेकर यांचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाल्याची हाती आलीय.

Shiv Sena Leader Died In Firing :
दुष्काळाच्या पाहणी दौऱ्याला दांडी; जिल्हाधिकाऱ्यांनी केज तहसीलदारांचा पदभार तडकाफडकी काढला

काही दिवसांपूर्वीच एका पोलीस उपनिरीक्षकाची हत्या ठाणे शहरात झाली होती. त्यात आता ही दुसरी हत्या झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. ठाणे महापालिका निवडणुकीत मनोरमा नगर भागातील प्रभाग क्रमांक ३ मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख असलेल्या प्रदीप पूर्णेकर यांच्या पत्नी विजेता पूर्णेकर आणि बंधू जयनाथ पूर्णेकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. तसेच प्रदीप यांचे बंधू जयनाथ ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com